कोरोना'चे सावट...हनुमान भक्तांनी घरूनच केली पूजाअर्चा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

यंदा "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून, कोणते ही गर्दी होईल अशा धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांना बंदी घातली आहे. 

जळगाव ः शहरासह सर्वत्र हनुमान जयंती दरवर्षी मोठ्या जल्लोषात व उत्साहपूर्ण वातावरणात साजरी 
केली जाते. परंतू कोरोना आजाराच्या वाढत्या प्रादुर्भाने पुकारलेले "लॉकडाऊन'मुळे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे हनुमान जयंतीच्या उत्साहावर विरजन पडले असून, धार्मिक कार्यक्रमांसह हनुमान मंदिरात होणारे महाप्रसादाचे कार्यक्रम रद्द झाले आहे. 

शहरातील तपस्वी हनुमान मंदिर, शनी मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर, रामदास कॉलनीतील हनुमान मंदिर, पत्र्या हनुमान मंदिर, गोलाणी मार्केटचे हनुमान मंदिर अशा शहरातील अनेक मंदिरात जयंतीला मोठा उत्साह पाहावयास मिळतो. परंतु यंदा "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून, कोणते ही गर्दी होईल अशा धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांना बंदी घातली आहे. 

मंदिरात केवळ पुजाअर्चा 
हनुमान मंदिरात हनुमान जयंतीला पुजारींकडून पुजाअर्चा केली जात आहे. कोरोनामुळे भाविकांनी मंदिरात 
गर्दी न करता घरीच हनुमानाची आराधना करावी, असे आवाहन शहरातील विविध हनुमान मंदिराच्या पुजाऱ्यांनी केले असल्याने हनुमान जयंतीला हनुमान मंदिरात आज गर्दी कमी दिसून आली. 

हनुमान भक्तांची घरूनच आराधना 
शहरातील अनेक हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनला धार्मीक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत असतात. परंतू यंदा कोरोनाच्या सावट मुळे हनुमान मंदिरात भाविकांनी न जाता हनुमानाची आराधना घरून केली आहे. घरीच सुंदरकांड, भजन व पुजाअर्चा भाविकांनी केली. 

कोट्यावधीची उलाढाल ठप्प 
हनुमान जयंतीला मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणात होत असतात. परंतू कोरोनामुळे सर्वच कार्यक्रम रद्द झाल्याने महाप्रसादाचे कार्यक्रम देखील यंदा एका ही ठिकाणी झालेले नाही. या महाप्रसादाच्या कार्यक्रमानिमित्त धान्य, किराणा, भाजीपाला, आचारी अशा व्यवसायाची कोट्यावधीची उलाढाल यंदा ठप्प झाली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Corona's Hanuman jayannti bhavik at home puja divhoshnal