नंदुरबार ः ना मुहूर्त, ना शुभारंभ, घरगुती वातावरणात उभारली गुढी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 March 2020

गुढीपाडव्याचे आगमन झाले. त्यामुळे गुढीपाडव्याचा आगमनाची चाहूलही लागली नाही. त्यामुळे ना गुढी पाडव्याचा उत्साह दिसून आला.

नंदुरबार ः कोरोना व्हायरसचा सावटाखाली आज गुढीपाडवा साजरा केला गेला. ना मुहूर्त, ना शुभारंभ ,ना कशाचे उद्घाटन अथवा गृहप्रवेश .अशा शुकशुकाट व घरगुती वातावरणातच गुढीपाडवा केला गेला. त्यामुळे गुढीपाडवा केव्हा आला, अन केव्हा गेला याची चाहूलही लागली नाही.

गुढी पाडवा म्हणजे मराठी नववर्षाचा प्रारंभ , या मराठी नववर्षानिमित्त गुढीपाडवाच्या शुभमुहूर्ताला खूपच महत्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढी पाडव्याला नवीन घरात , दुकानात अथवा लयात कार्यालयात प्रवेश, नवीन प्रतिष्ठानचा शुभारंभ, नवीन व्यवसायाचा प्रारंभ याच दिवशी करण्यास प्राधान्य दिले जाते. तसेच गृहिणी या दिवशी सोनेचांदीचे दागिने खरेदीसही प्राधान्य देतात.मात्र गेल्या पंधरा दिवसापासून कोरोना चे सावट पसरले आहे. त्या सावटात नागरिक कोरोनाची भिती बाळगून आहेत. दुकाने, प्रतिष्ठाने बंद आहेत. बाजारपेठ ठप्प झाली आहे. अशा स्थितीत गुढीपाडव्याचे आगमन झाले. त्यामुळे गुढीपाडव्याचा आगमनाची चाहूलही लागली नाही. त्यामुळे ना गुढी पाडव्याचा उत्साह दिसून आला. बाजारपेठेत शुकशुकाट होता. नवीन मुहूर्त झाले नाहीत. त्यामुळे आजचा गुढीपाडवा नागरिकांनी कौटुंबिक वातावरणात घरगुती साजरा केला.

 

पोलिस, आरोग्य कर्मचाऱ्यांना सुगावाही नाही

कोरोना चा संसर्गाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे त्याचा प्रतिबंधासाठी डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी शहरासह ग्रामीण भागात कोरोना शी दोन हात करीत आहेत. रांत्रदिवस उपाययोजना व जनजागृती करीत आहेत. तर पोलिस जनतेने घराबाहेर येऊ नये, म्हणून रस्त्यावर आपली सेवा बजावत आहेत. त्यामुळे त्यांचासाठी कसला सण -उत्सव त्याचा सुगावाही नाही


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Corona's shaft over the Gudi Padwa