"कोरोनांचे' सावट झुगारून शहरात धुळवडीचा जल्लोष ! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 मार्च 2020

"कोरोनाचा' प्रसार तसेच शासनाकडून  ही धुलिवंदनचे कार्यक्रम न घेण्याचे आवाहनाला अनेक आयोजकांनी साथ देत आपले नियोजीत कार्यक्रम रद्द केल्याचे जळगाव शहरात दिसून आले. 

जळगाव ः जळगाव शहरात धूलिवंदन निमित्त दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात अनेक ठिकाणी पाण्याचे हौद, रेन वॉटर असे प्रकार तयार करून रंगाची उधळण केली जाते. परंतू यंदा "कोरोना' व्हायरस आजाराचे तीव्रता पाहता खबरदारी पाहता शासनाकडून रंगपंचमी तसेच सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला जळगाव शहरात चांगला प्रतिसाद लाभला जरी असला तरी "कोरोनाचे' सावट झुगारून नागरिकांनी कोरडी धुळवड खेळून रंगाची उधळण करत धुलिवंदनच आनंद घेतला. 

जळगाव शहरात दरवर्षी धूलिवंदन निमित्त मोठा उत्साह लहानांपासून तर मोठ्यापर्यंत पाहण्यास मिळतो. त्यात विविध संस्था तसेच आयोजकांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असतात. यात काव्यरत्नावली चौकात पाण्याचे हौद बांधून तरुणी, तरुणांची गर्दी येथे रंगपंचमी खेळली जाते. तसेच नेहरु चौकात नेहरु मित्र मंडळातर्फे तरुणांसाठी रेन डान्सिंग रंगपंचमी अशा अनेक ठिकाणी लहान मोठ्या स्वरुपात रंपचंमी निमित्त धुळवडचा कार्यक्रम घेण्यात येतो. परंतू यंदा "कोरोनाचा' प्रसार तसेच शासनाकडून  ही धुलिवंदनचे कार्यक्रम न घेण्याचे आवाहनाला अनेक आयोजकांनी साथ देत आपले नियोजीत कार्यक्रम रद्द केल्याचे जळगाव शहरात दिसून आले. 

केवळ एकाच ठिकाणी धुलिवंदनाचा कार्यक्रम 
जळगाव शहरात "कोरोना'मुळे अनेक आयोजकांनी आपले धुलिवंदनाचा कार्यक्रम शासनाच्या आवाहनानुसार रद्द केले. यात काव्यरत्नावली चौक, नेहरु चौक मित्र मंडळ, मू. जे. महाविद्यालय, नूतन मराठा कॉलेजमधील होणारा कार्यक्रम असे शहरातील अनेक मुख्य चौकात होणारे कार्यक्रम अतिशय कमी दिसून आले. केवळ जे. के. पार्क मध्ये धुलिवंदन कार्यक्रम झाले. 

कोरड्या रंगाची उधळण अधिक 
पाण्याचा वापर न करता कोरड्या रंगाचा धुलीवंदन खेळण्यावर नागरिकांनी भर दिल्याचे दिसून आले. यात घरोघरी मित्रमैत्रिणांचे गृप, काही कुटुंबांनी एकत्र येऊन कोरड्या रंगाची उधळण करून रंगपंचमी खेळली. लहान मुलांमध्ये देखील उत्साह दिसून येत असला तरी नैसर्गिक व कोरड्या रंगाने धुलिवंदन खेळणे हे कटाकक्षाने पाळले जात असल्याचे दिसून आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon "Coronation's" swinging holi festival

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: