भाजप- शिवसेना सदस्यांत खडाजंगी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

जळगाव : सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णकृती पुतळ्याच्या मुद्द्यावरून आज जळगाव शहर महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी भाजप आणि विरोधीपक्ष शिवसेनेच्या सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. पुतळा उभारण्यासाठी भाजपने मांडलेल्या ठरावावर केवळ लेवा समाजाच्या नगरसेवकांच्या सह्या घेतल्या असल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी ठरावाला हरकत घेत महापुरुषांना जातीपातीत वाटू नका. तसेच जातीपातीचे राजकारण करणे ही भाजपची कार्यपद्धती आहे असे आरोप शिवेसना सदस्यांनी केल्यावर महासभेत दोन्ही गटातील सदस्यांच्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप एकच गोंधळ उडाला. 

महापालिकेची महासभा सकाळी अकरा वाजता महापौर भारती सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या व्यासपीठावर उपायुक्त अजित मुठे, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच शिवसेना सदस्य नितीन लढ्ढा यांनी महापालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे हे सभेला उपस्थित नसल्याने नाराजी व्यक्त करत भूसंपादन व समांतर रस्ता बाबत महत्त्वपूर्ण विषयांवर निर्णय व चर्चा अपेक्षित असताना आयुक्तच हजर नसल्याने सभेला अर्थ नसल्याची नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. विषयपत्रीकेवरील अकरा विषया पैकी दोन विषय तहकुब ठेवत अन्य विषयांना मंजूरी देण्यात आले. 

अन्‌... शिवसेना भाजप सदस्यांत जुंपली 
अशासकीय प्रस्तावात भाजप नगरसेवक सुनील खडके यांनी, महापालिकेच्या प्रांगणात सरदार वल्लभभाई पटेल यांचा अर्धाकृतीऐवजी पूर्णाकृती पुतळा बसविण्याबाबत ठराव आला. याबबतच्या सदस्यांच्या सहीच्या पत्रावर शिवसेनेचे नगरसेवक इब्राहिम पटेल म्हणाले, की ठरावाला आमचा विरोध नाही. मात्र, भाजपने ठरावात लेवा पाटील समाजाच्या नगरसेवकांच्या सह्या घेतल्या. हा ठराव सहीसाठी माझ्याकडे पाठवला असता तरी मी त्यावर विनाहरकत सही केली असती. कारण सरदार पटेल हे सर्वांचे राष्ट्रपुरूष होते. अशा महापुरुषांना अशा पद्धतीने जातीपातीत वाटू नका, असा टोला पटेल यांनी लगावला. त्यावर भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corporation mahasabha bjp sena member