जळगाव मनपाचे आयुक्त कुलकर्णींनी घेतला पदभार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 मार्च 2020

जळगाव : दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या आयुक्तपदी मुंबईच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे उपसंचालक सतीश कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली. सतीश कुलकर्णी यांनी आज (ता. 16) मनपाच्या आयुक्‍त पदाचा पदभार स्वीकारला. 

जळगाव : दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या आयुक्तपदी मुंबईच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे उपसंचालक सतीश कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली. सतीश कुलकर्णी यांनी आज (ता. 16) मनपाच्या आयुक्‍त पदाचा पदभार स्वीकारला. 
महापालिकेचे तत्कालिन आयुक्‍त डॉ. उदय टेकाळे निवृत्त झाल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार होता. मनपाच्या रिक्‍त असलेल्या आयुक्‍त पदी नागपूर येथील वस्त्रोद्योग महामंडळाच्या संचालिका आयएएस अधिकारी माधवी खोडे-चवरे यांची आयुक्तपदी नियुक्ती झाल्याचे पत्र 12 फेब्रुवारीला काढण्यात आले होते. परंतु काही कारणात्सव श्रीमती खोडे- चवरे या रूजू झाल्या नाही. शिवाय नियमित आयुक्‍त नसल्याने महापालिकेचे प्रश्‍न प्रलंबित होते असल्याने नवीन आयुक्तांची नियुक्ती करण्याची मागणी आमदार सुरेश भोळे यांनी विधानसभेत केली होती. त्यानुसार आयुक्तपदी शासनाने सतीश कुलकर्णी यांची दोन दिवसांपूर्वी नियुक्ती करण्यात आली असताना श्री. कुलकर्णी यांनी आज आयुक्तपदाचा कार्यभार सकाळी अकराला स्वीकारला. 

महापौरांनी केले स्वागत 
आयुक्‍त कुलकर्णी हे पदभार घेण्यासाठी महापालिकेत अकराला दाखल झाले होते. यावेळी ते लिफ्टमधून सतराव्या मजल्यावर गेले असता महापौर भारती सोनवणे यांनी त्यांच्या दालनात पुष्पगूच्छ देवून स्वागत केले. यानंतर त्यांनी दालनात जावून पदभार स्विकारला. लागलीच आयुक्‍त कुलकर्णी यांनी महापालिकेच्या सर्व अभियंत्यांना बोलावून कामाचा आढावा घेण्यास सुरवात केली.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corporation new commissioner satish kulkarni Office