बीटी कपाशी बियाण्यांची आजपासून विक्री 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

जळगाव ः जिल्ह्यात उद्यापासून (25 मे) बीटी बियाणे विक्रेत्यांकडे उपलब्ध होणार असून, त्याची विक्रीही होणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. यंदा एक जूनपासून बीटी बियाणे विक्रीस उपलब्ध होणार होते. मात्र, एक जूनपासून विक्री केल्यास बियाण्यांचा काळाबाजार होऊन शेतकऱ्यांचीही फसवणूक होऊ शकते, हे लक्षात घेता बीटी बियाण्यांची विक्री 25 मेपासून करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 

कपाशीवरील गुलाबी बोंडअळीला रोखण्यासाठी एक जूनपासूनच बीटी बियाणे विक्रीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, खानदेशातील अनेक शेतकरी बागायती कपाशी घेतात. त्यांच्याकडे विहिरींना पाणीही आहे. अनेक शेतकऱ्यांनी गुजरातमधून बियाणे आणली आहेत. त्यात बियाणे विकताना काळाबाजार होऊन शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. गुजरातमधून आणलेल्या बियाण्यांचीही हीच स्थिती होऊ शकते. फसवणुकीचे प्रकार लक्षात घेता, शासनाने कापूस बियाणे 25 मेपासून विक्री करण्याचे आदेश दिले आहेत. 

अडीच लाख पाकिटे दाखल 
जिल्ह्यातून 25 लाख बीटी कापूस बियाण्यांच्या पाकिटांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. पैकी गुदामांमध्ये बियाण्यांची सुमारे अडीच लाख पाकिटे दाखल झाली आहेत. काही कंपन्यांनी वितरकांकडे हे बियाणे पाठविले आहेत. बियाणे विक्रेत्यांना बियाण्यांची विक्री 25 मेपासून करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात सुमारे साडेपाच लाख हेक्‍टरवर कपाशीची लागवड होण्याची शक्‍यता आहे. 

एक जूनऐवजी 25 मेपासून बी.टी. बियाणे विक्री करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. जिल्ह्यात कपाशीच्या बियाण्यांची सुमारे अडीच लाख पाकिटे गुदामात दाखल झाली आहेत. शेतकऱ्यांनी एक जूननंतरच कपाशीचे बियाणे पेरावे. 
- संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon cottone bt seeds