चिंताजणक...जिल्ह्यात अजून तेरा कोरोना बाधित रूग्ण आढळले 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

अमळनेर पाठोपाठ आता भडगाव मध्ये देखील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. दोन-तीन दिवसात भडगाव संशयीतांचे घेतलेले नमूने सर्वाधीक निगेटिव्ह अहवाल आले होते.

जळगावः जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून चिंताजणक बाब आहे. भडगाव, जळगाव, चोपडा, भुसावळ, अमळनेर, धरणगाव, जामनेर येथील स्वॅब घेतलेल्या 48 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 35 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर "तेरा' तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. 

जिल्ह्यात अमळनेर, जळगाव, भुसावळ शहरातील "कोरोना' बाधित रुग्णांची संख्या वाढू लागलेली असून ही चिंताजणक गोष्ट आहे. त्यात आता भडगाव मध्ये देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती मध्ये भडगावचे बारा तर भुसावळ येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 279 झाली आहे. 

भडगावची परिस्थीती चितांजणक 
अमळनेर पाठोपाठ आता भडगाव मध्ये देखील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. दोन-तीन दिवसात भडगाव संशयीतांचे घेतलेले नमूने सर्वाधीक निगेटिव्ह अहवाल आले होते. पण आता रविवारी तसेच आज कोरोना बाधित रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने भडगावची परिस्थिती चिंताजणक झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon distrik again 13 corona Patient report positive

Tags
टॉपिकस
Topic Tags: