पक्षाला शिव्या देणाऱ्यांना आमदारकीची संधी : एकनाथराव खडसे   | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

eknath Khadse

भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी पक्षाने आपणास उमेदवारी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली आहे.

पक्षाला शिव्या देणाऱ्यांना आमदारकीची संधी : एकनाथराव खडसे  

जळगाव : पक्षाच्या विरोधात काम करणारे, पक्षाला शिव्या देणारे तसेच बाहेरून पक्षात आलेल्यांना पक्षाने आमदारकीची संधी दिलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष कोणत्या दिशेने चालला आहे, याबाबत चिंतन करणे गरजेचे आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजप नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली. 
भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी पक्षाने आपणास उमेदवारी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली आहे. यासंदर्भात मुक्ताईनगर येथे त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की विधान परिषदेसाठी मी, पंकजा मुंडे व चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची शिफारस पक्षाने केली असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. मात्र, अचानक आमच्या तिघांऐवजी नवीनच चार जणांना संधी देण्यात आली आहे. नवीन संधी देण्यात आलेले गोपीनाथ पडळकर यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला विरोध करून "मोदी गो-बॅक'च्या घोषणा दिल्या होत्या; तर रणजितसिंह मोहिते-पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून आलेले आहेत. नांदेड येथील डॉ. अजित गोपछडे हेही नवीनच आहेत. त्यामुळे पक्षाने नवीन लोकांना संधी देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. आपण गेल्या 40 ते 42 वर्षांपासून पक्षकार्य करीत आहोत. पक्षात अनेक चढउतार आपण पाहिले. तसेच पक्षात आपले योगदानही आहे. त्यामुळे पक्ष आपला विचार करेल किंवा पक्षात कार्य करणाऱ्या नेत्यांचा विचार होईल, अशी अपेक्षा होती. परंतु दुर्दैवाने ते होऊ शकलेले नाही. पक्षाने चक्क पक्षाच्या विरोधात काम करणारे पडळकर, "राष्ट्रवादी'तून आलेले रणजितसिंह मोहिते-पाटील यांना संधी दिली. त्यामुळे भाजप आता कोणत्या दिशेने चालला आहे, याचे चिंतन करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे.  
 

Web Title: Marathi News Jalgaon Eknath Khadse No Chance Vidhanparishad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top