आपत्कालीन स्थितीसाठी साडेतीन हजारांवर "बेड' :  डॉ. चव्हाण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 एप्रिल 2020

आतापर्यंत केवळ दोन "कोरोना पॉझिटिव्ह' रुग्ण आढळून आले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. भविष्यात आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवू नये, यासाठी जिल्हा प्रशासन आवश्‍यक ती खबरदारी घेत आहे.

जळगाव ः "कोरोना'चा हल्ला परतून लावण्यासाठी केंद्र, राज्य शासन व जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवीत आहे. जिल्ह्यात "कोरोना' संशयित रुग्णांची तपासणी करणे, त्यांचे विलगीकरण करणे, पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करणे आदी बाबींसाठी जिल्हाभरात 3 हजार 806 "बेड'ची तयारी पूर्ण केली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी शासनाच्या आरोग्य विभागास पाठविली आहे. 

जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व "लॉकडाउन'च्या काळात नागरिकांचे मिळणारे सहकार्य यामुळे इतर ठिकाणच्या तुलनेत स्थिती अद्याप नियंत्रणात आहे. आतापर्यंत केवळ दोन "कोरोना पॉझिटिव्ह' रुग्ण आढळून आले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. भविष्यात आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवू नये, यासाठी जिल्हा प्रशासन आवश्‍यक ती खबरदारी घेत आहे. भविष्यात काही आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवलीच तर त्यास सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. माहिती घेऊन जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांचे सर्वेक्षण केले आहे. जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा रुग्णालयाचे "कोविड 19' रुग्णालय म्हणून रूपांतर केले आहे. यासह जिल्ह्यातील इतर शासकीय व खासगी 16 रुग्णालयांमध्ये नागरिकांना दाखल करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या रुग्णालयांमध्ये 501 बेड सर्व सुविधांसह तयार झाले आहे. आवश्‍यकता भासेल त्याप्रमाणे 2 हजार 919 बेड तयार ठेवून वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

बेड तयार रुग्णालये व बेडची संख्या 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय : 100 
शाहू महाराज रुग्णालय : 35 
उपजिल्हा रुग्णालय (चोपडा) : 30 
मुक्ताईनगर : 15 
जामनेर : 15 
सतरा ग्रामीण रुग्णालयांत प्रत्येकी : 10 बेड (एकूण 170 बेड) 
भुसावळ रेल्वे रुग्णालय : 136 
ऑर्डिनन्स फॅक्‍टरी (वरणगाव) : 50 
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय : 100 
आदिवासी वसतिगृहे : 2020 
मागासवर्गीय मुले-मुलींचे वसतिगृह : 471 
विद्यापीठातील स्पोटर्स क्‍लब : 218 
चैतन्य आयुर्वेदिक हॉस्पिटल : 60 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Emergency "beds" at three and a half thousand District Surgeon Dr. Chewhan stetment