esakal | "कोरोना'वर मात करणाऱ्यांचेही शतक पार 
sakal

बोलून बातमी शोधा

"कोरोना'वर मात करणाऱ्यांचेही शतक पार 

17 एप्रिलला "ग्रीन झोन' असलेल्या जिल्ह्यात महिनाभरात "कोरोना'ग्रस्तांची संख्या तब्बल 317 वर पोहोचली.

"कोरोना'वर मात करणाऱ्यांचेही शतक पार 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव  : एकीकडे "कोरोना' संसर्गाचा उद्रेक होत असताना "कोरोना'वर मात करणाऱ्याची संख्याही 110 वर गेली असून, ही सर्वांसाठी दिलासादायक बाब आहे. हे प्रमाण टक्केवारीनुसार 30 टक्के आहे. जळगाव जिल्हा प्रशासन "कोरोना'चा संसर्ग रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. 17 एप्रिलला "ग्रीन झोन' असलेल्या जिल्ह्यात महिनाभरात "कोरोना'ग्रस्तांची संख्या तब्बल 317 वर पोहोचली. दुर्दैवाने यापैकी 37 रुग्णांचा बळी गेला असून, हे प्रमाण तब्बल 13 टक्के आहे. 


अशी आहे आकडेवारी 
तालुका-- रुग्णसंख्या---बरे झालेले---मृत्यू 
जळगाव--66--8---7 
भुसावळ---62---9---14 
अमळनेर---105--78--9 
चोपडा--19---1---3 
पाचोरा---22---13--3 
भडगाव 24---00---1 
यावल---5---00--0 
धरणगाव--10---00-- 0 
रावेर-- 2---00--- 0 
दुसऱ्या जिल्ह्यातील---1---1-- 0 

एकूण 317---110----37 
 

loading image