अनुदान वाटपात दिरंगाई

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

जळगाव : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्राप्त झालेल्या अनुदानाचे वितरण करण्यात दिरंगाई केल्याने चार तहसीलदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. या चारही तहसीलदारांकडून खुलासा मागविण्यात आला असून खुलासा समाधानकारक नसल्यास कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. 
जिल्ह्यात ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 6 लाखाहून अधिक हेक्‍टर शेती पिकाचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत 

मिळावी म्हणून 643 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यापैकी 6 लाख 30 हजार 871 शेतकऱ्यांसाठी 179 कोटी 97 लाख 1 हजार रुपयांचे अनुदान प्रशासनाला प्राप्त झाले. या प्राप्त झालेल्या अनुदानाचे तहसीलदारांना तातडीने वितरण करण्यात येऊन ते शेतकऱ्यांच्या खात्यावर 
त्वरित जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार तहसीलदारांनी अनुदान वाटपाला सुरवात केली. या अनुदान वाटपाचा दैनंदिन अहवाल प्रशासनाने तहसीलदारांकडून मागविला होता. अहवालानुसार जिल्ह्यात आत्तापर्यंत 2 लाख 44 हजार 852 शेतकऱ्यांना 166 कोटी 17 लाख 85 हजार 335 रुपये अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. एकूण 92.62 टक्के अनुदान वाटप झाले असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. 

चार तालुक्‍यात कमी वाटप 
जिल्ह्यातील भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, रावेर, चाळीसगाव, अमळनेर, चोपडा या तालुक्‍यातील शेतकऱ्यांना अनुदानाचे 100 टक्के वितरण करण्यात आले आहे. तर एरंडोल, पाचोरा, भडगाव आणि पारोळा या चार तालुक्‍यातील तहसीलदारांनी अनुदान वाटपात दिरंगाई केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांच्या आदेशान्वये चारही तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून त्यांच्याकडून खुलासा देखिल मागविण्यात आला आहे. 

अशी आहे अनुदान वाटपाची टक्केवारी 
जळगाव - 99.70 टक्के, जामनेर - 99.98, एरंडोल -60.08, धरणगाव-98.12., भुसावळ-100 , बोदवड-100 , मुक्ताईनगर- 100, यावल -99.99, रावेर -100, पाचोरा-74.90, भडगाव-74.54, पारोळा- 81.19, चाळीसगाव-100 , अमळनेर -100 , चोपडा -100 टक्के अनुदान वाटप झाले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon farmer anudan distrubution