वडिलांवर कर्ज मुलाने संपविले जीवन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

कर्जफेडीची शक्यता कमी होऊन कर्जाचा डोंगर वाढला. कौटुंबिक मनस्ताप वाढल्याने त्यातून राहुल सोनवणे या युवकाने स्वतःला धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली.

पाचोरा : बाळद बुद्रूक (ता. पाचोरा) येथील ३३ वर्षीय युवकाने वडिलांवर असलेल्या कर्जाला कंटाळून रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत पाचोरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 
बाळद बुद्रूक (ता. पाचोरा) येथील भाऊसाहेब सोनवणे यांच्या नावे दोन एकर शेतजमीन आहे. पत्नी, दोन मुले, दोन मुली यांचा उदरनिर्वाह ते या शेतीवर भागवतात. गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळामुळे तर यंदा अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील हातचे उत्पादन गेले. त्यामुळे कर्जफेडीची शक्यता कमी होऊन कर्जाचा डोंगर वाढला. कौटुंबिक मनस्ताप वाढल्याने त्यातून राहुल सोनवणे या युवकाने स्वतःला धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. राहुलची प्रकृती बरी नसल्याने ‘मी मेडिकलवरून औषधी घेऊन येतो’ असे सांगून तो घरून निघाला. मात्र, घरी परतलाच नाही. त्याचा सर्वत्र शोध घेतला असता, दुसऱ्या दिवशी सकाळी बाळद शिवारातील रेल्वे खांबा क्रमांक ३५७/८७ जवळ त्याचा मृतदेह आढळला. पोलिसांनी पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी शवविच्छेदन केले. याबाबत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस निरीक्षक अनिल शिंदे तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon farmer loan child sucide