घरापेक्षा रुग्णालयात अधिक वेळ देत "कोरोना'शी लढा! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 मार्च 2020

सध्याची परिस्थिती पाहता कोरोनाशी दोन हात करण्यासाठी वैद्यकीय पथक काम करीत आहे. यातून सावरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यात जिल्हा रुग्णालय प्रशासन

जळगाव ः जगात पसरलेल्या "कोरोना व्हायरस'शी दोन हात करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील आहे. हजारो हात तत्परतेने काम करत आहेत. यात "कोरोना'चे लक्षण जाणवल्यानंतर जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्यांसाठी "ओपीडी' कक्ष सुरू करण्यात आला आहे. याठिकाणी दिवसभर एक पथक काम सांभाळत आहे. घरापेक्षा जास्त वेळ येथे घालवून एक प्रकारे "कोरोना'शी लढा देण्याचे काम पथक करत आहे. 

कोरोना व्हायरस सर्वत्र पसरला आहे. सुरक्षा म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु, या संचारबंदीनंतर स्थिती किती सावरली जाणार हे येणारा काळच सांगू शकेल. तरी देखील सध्याची परिस्थिती पाहता कोरोनाशी दोन हात करण्यासाठी वैद्यकीय पथक काम करीत आहे. यातून सावरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यात जिल्हा रुग्णालय प्रशासन अहोरात्र कार्य करत आहे. 

"ओपीडी'त बारा तास 
"कोरोना व्हायरस'ची लक्षणे जाणवल्यानंतर त्याच्या तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र ओपीडी कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षात सहा डॉक्‍टर, सिनिअर क्‍लर्क 1, दोन नर्स आणि चार वॉर्डबॉय कार्यरत आहेत. ही संपूर्ण टीम सकाळी आठपासून ओपीडी कक्षात कार्यरत असून, रात्री आठपर्यंत सेवेत असतात. बारा तासाच्या सेवेत दोनशेहून अधिक रुग्णांची तपासणी करण्याचे काम टिम करत आहे. अर्थात गेल्या काही दिवसांपासून टीममधील सर्वच सदस्य परिवारातील सदस्यांपासून दूर राहत असून, कोरोना व्हायरसला हद्दपार करण्यासाठी लढा देत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Fighting "Corona" giving more time to the hospital than at home!