या....देवदूतांमुळेच झाला माझा पुर्नजन्म !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 एप्रिल 2020

पॉझिटिव्ह रुग्णाला आयसोलेशन वार्डात दाखल करुन वैद्यकीय महाविद्यालयाच्या संपूर्ण टिमने या रुग्णावर तब्बल 17 दिवस उपचार केले. काही दिवसानंतर त्या रुग्णाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याने या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आज सुटकेचा निश्‍वास सोडला. 

जळगाव:  माझा कोरोना पॉझिटिव्हचा अहवाल आल्यानंतर माझ्यामनात प्रचंड भिती निर्माण झाली होती. मात्र कोरोना वार्डातील डॉक्‍टरांसह सर्व कर्मचाऱ्यांनी माझ्यावर कुटूंबातील सदस्याप्रमाणे उपचार करु माला बरे केले. त्यामूळे हे सर्व माझ्यासठी खरे देवदूत ठरले असून त्यांच्यामूळेच माझा पूर्नजन्म झाल्याची भावना पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह मुक्त झालेल्या रुग्णाने व्यक्त केली. 

शहरातील मेहरुण परिसरातील व्यक्ती मुंबईला पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्याला कोरोनाची लक्षणे जाणवत होती. परंतू अनेक दिवस उपचार करुन देखील प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने ता. 27 रोजी हा रुग्ण जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल झाला. याठिकाणी या रुग्णाचे नमूने तपासणीसाठी पुणे पाठविण्यात आले होते. त्या रुग्णाचा ता. 28 रोजी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हादरुन गेली होती. त्यावेळेपासून या पॉझिटिव्ह रुग्णाला आयसोलेशन वार्डात दाखल करुन वैद्यकीय महाविद्यालयाच्या संपूर्ण टिमने या रुग्णावर तब्बल 17 दिवस उपचार केले. काही दिवसानंतर त्या रुग्णाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याने या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आज सुटकेचा निश्‍वास सोडला. 

टाळ्या वाजवून केले रवाना 
शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे 14 दिवसानंतर ता. 13 व ता. 14 रोजी 24 तासाच्या अंतराने पाठविण्यात आले होते. या दोन्ही नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर आज बुधवारी ता. 15 रोजी या पॉझिटिव्ह रुग्णाला कोरोना मुक्त झाल्याचे सांगून त्याला जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोनावार्डातून डिक्‍सचार्ज देण्यात आला. तसेच या रुग्णावर उपचार करणाऱ्या संपूर्ण वैद्यकीय यंत्रणेने टाळ्या वाजवून त्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला रुग्णालयातून डिक्‍सचार्ज देण्यात आला. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. 

हे आहेत कोरोना वार्डातील रिअल हिरो 
कोरोना वार्डात रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्‍टर, परिचारीका असे मिळून 36 जणांची नेमणुक करण्यात आली आहे. हे सर्व शिप्ट प्रमाणे काम करीत असून दिवसरात्र कोरोना रुग्णांवर त्यांच्याकडून उपचार केले जात आहे. शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉ. किरण पाटील, डॉ. विजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मिलिंद पवार, डॉ. मारुती पोटे, डॉ. दत्तात्रय बिराजदार, विजय पंचलवार, सुयोग चौधरी, अमित भंगाळे, पारिचारिका व कर्मचारी, नेहा चौधरी, रोहन केळकर, शालीनी खानापूरकर, डॉ. प्रसाद, तुषार सोनवणे, गजानन चौधरी, सविता अग्नीहोत्री, जयश्री जोगी, सरला बागुल, नम्रता खानापूरकर, कविता तायडे, सुमित्रा वक्ते, लता त्रिमाली, मनिषा सोळुंखे, शंकुतला सुरवाडे, निलम पाटील यांचा समावेश आहे. या सर्वांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर दिवसरात्र उपचार करुन त्याला कोरोनापासून मुक्त केल्याने या हे वैद्यकीय कर्मचारी आज खरे रिअल हिरो ठरले आहे. 

कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर संपूर्ण वैद्यकीय यंत्रणेमध्ये भितीचे वातवरण तयार झाले होते. कारण या आधी कोरोनाचा कुठल्याच रुग्णावर कोणीही उपचार केले नव्हती. प्रत्येकाला आपल्याला संसर्ग होणार नाही याची मनात भिती निर्माण झाली होती. परंतू सर्वांना वेळोवेळी धीर देत त्या पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार करण्यात संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा यशस्वी ठरली, असून जळगावातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जळगावात देखील पूर्णपणे बरा होवून आज घरी परतला असल्याने आम्हा सर्वांना याचा अभिमान आहे. 
डॉ. भास्कर खैरे, अधिष्ठाता, जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय. 

मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समल्यानंतर माझ्यासह संपूर्ण कुटूंब तणावात होतो. मी पुन्हा बरा होवून घरी पुन्हा जाणार नाही असे वाटले नव्हते. परंतू जिल्हा रुग्णालयातील कोरोना वार्डात माझ्यावर खूप चांगल्या पद्धतीने उपचार झाले. त्यामूळे मी 17 दिवसातच बरा होवू घरी परतत आहे. माझ्यावर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्‍टर, सिस्टर व कर्मचाऱ्यांचा मी खूप खूप आभारी असल्याची प्रतिक्रीया पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi News jalgaon The first corona positively released patient and go to hoom