"मी पुन्हा येईन' पेरू विकायला! प्रिंपाळा आठवडे बाजारात शेतकऱ्याने लढविली शक्कल

भरत पाटील, सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

जळगाव ः नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील प्रचारावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या विश्‍वासाने "मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन'ची हाक मतदारांना दिली होती. त्या अनुषंगाने निवडणूक निकालात भाजपला सर्वाधिक 105 जागा मिळाल्या. मात्र, महायुतीतून शिवसेनेने बाहेर पडत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत महाविकास आघाडी करून सत्ता स्थापन केली अन्‌ संपूर्ण राज्यात या आघाडीच्या अनेक नेत्यांनी फडणवीस यांच्या "मी पुन्हा येईन'च्या हाकेची वेगवेगळ्या पद्धतीने तसेच सोशल मीडियावरूनही काहींनी पुरती खिल्ली उडविली. याचा प्रत्यय काल येथील पिंप्राळा उपनगरातील आठवडे बाजारातही आला.

आपले पदार्थ विक्रीसाठी कोण कशाप्रकारे शक्कल लढविल, याचे सांगता येत नाही. विक्रेते आपआपल्यापरिने शक्कल लढवून माल खपविण्याचा प्रयत्न करत असतात, अर्थांत त्यांच्या या आयडीयाला लोकंकडूनही कधी चागंला प्रतिसाद मिळतो तर कधी तिकडे फिरकतही नाही. 

जरूर वाचा-घटस्फोटीत,विधवाना तो अमिष दाखवायचा...अखेर सापडला

बाजारात चर्चेचा विषय

  पिंप्राळा उपनगरात दर बुधवारी आठवडे बाजार भरतो. काल नेहमीप्रमाणे हा बाजार भरलेला होता. त्यात धरणगाव तालुक्‍यातील शेतकरी स्वतः पेरू विक्रीसाठी आलेला होता. त्याने पेरू विक्री करताना चक्क नामी शक्कल लढविली. "पेरू 40 रुपये किलो. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन पिंप्राळ्यातील आठवडे बाजारात पेरू विकायला' अशी हाक दिली अन्‌ बाजारातील ग्राहकांचे आपल्याकडे लक्ष वेधले.

हाकेमुळे पेरूची विक्री

या हाकेमुळे या शेतकऱ्याच्या पेरूंची पटकन मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे दिसून आले. याचवेळी "मी पुन्हा येईन'च्या हाकेची आपले पेरू विक्रीसाठी संबंधित शेतकऱ्याने नामी शक्कल लढविल्याने ग्राहकांमध्ये हशा पिकून जोरदार चर्चाही झाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon fruit seller new selling idea