esakal | आता...व्हॉट्‌ऍपद्वारेच द्या श्रद्धांजली; अंत्ययात्रेत न येण्याचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

tribute

अंत्ययात्रांवरही लोकांनी न जाणेही पसंत केले असले; तरी नातेवाईकांकडून देखील अंत्ययात्रेला न येता व्हॉट्‌ऍपच्या माध्यमातूनच श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन व्हॉटस्‌ऍपच्या माध्यमातून केले जात आहे. 

आता...व्हॉट्‌ऍपद्वारेच द्या श्रद्धांजली; अंत्ययात्रेत न येण्याचे आवाहन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कोरोना व्हायरसने सर्व जगाला आपल्या पाशात घेतले असून नागरिकांचे जिवन अत्यव्यस्थ झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या विदारक परिस्थीतीला आळा बसवण्यासाठी राज्यात लॉकडॉउनचे आदेश जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत. गर्दी होणारे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यामुळे आता अंत्ययात्रांवरही लोकांनी न जाणेही पसंत केले असले; तरी नातेवाईकांकडून देखील अंत्ययात्रेला न येता व्हॉट्‌ऍपच्या माध्यमातूनच श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन व्हॉटस्‌ऍपच्या माध्यमातून केले जात आहे. 
जळगाव शहरातील रहिवासी दिलीप भाटे (गनात्रा) (वय 75) यांचे आज सकाळी वृद्धपकाळाने निधन झाले. ते प्रसिद्ध चित्र कलावंत तरुण भाटे यांचे वडील होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या शहरात संचारबंदी असल्याने स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जाताना गर्दी होऊ नये; यासाठी गनात्रा परिवारातर्फे आपल्या बाहेरगावातील नातेवाईकांना अंत्ययात्रेला न येता फक्त व्हॉट्‌ऍप किंवा मॅसेजकरूनच श्रद्धांजली देण्याचे आवाहन केले आहे. 

दुःखातही केले आवाहन 
कोरोनाच्या या लढाईत अंत्ययात्रेत गर्दी न होण्यासाठी गनात्रा परिवाने हा निर्णय घेतला आहे. गनात्रा परिवारावर कोसळलेल्या दुःखातही त्यांनी प्रशासनाने नागरीकांसाठी केलेल्या लॉकडाऊन निर्णयाचे पालन केले व आपल्या नातेवाईकांना शहारात येऊ नका; असे आवाहन करून फक्त व्हॉट्‌अपद्वारे श्रद्धांजली देत आमच्या दु:खात सहभागी होण्याचे आवाहन केले. आता लोकांकडून अंत्ययात्रेत प्रत्यक्ष सहभागी न होताच सोशलनेटवर्कचा वापर करून श्रद्धांजलीही स्वीकारली जाऊ लागल्याचे चित्र कोरोना विषाणूच्या प्रार्दुभाव रोखण्यासाठी करावे लागत असल्याचे विदारक दुष्य समोर येत आहे. 

loading image
go to top