esakal | "आरती समरसतेची'तून आदर्श पायंडा! 
sakal

बोलून बातमी शोधा

live photo

"आरती समरसतेची'तून आदर्श पायंडा! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः गणेशोत्सवापासून दूर राहणाऱ्या उपेक्षित घटकातील परिवारांना आज आरती करण्याचा बहुमान मिळाला. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने "आरती समरसतेची' हा अनोखा उपक्रम राबवून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 
गणेशोत्सवाला आजपासून सुरवात झाली. उत्सवादरम्यान सकाळी आणि सायंकाळी गणरायाची आरती मंडळाच्या समोर मान्यवरांच्या हस्ते करण्यात येते. परंतु, समाजातील दुर्लक्षित व उपेक्षित वर्गातील कुटुंबांना आरतीचा बहुमान मिळत नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने गतवर्षापासून "आरती समरसतेची' हा उपक्रम सुरू केला असून, या उपक्रमात आज (ता.2) गणरायाचे आगमन होत असताना मंडळांकडून स्वागत मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुकीच्या सुरवातीला महामंडळातर्फे टॉवर चौकात सायंकाळी साडेपाचला "आरती समरसतेची' करण्यात आली. 

पाच जोडप्यांच्या हस्ते आरती 
सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे "आरती समरसतेची' हा उपक्रम यावर्षी देखील राबविण्यात आला. गणेश स्थापना करण्यापूर्वी मंडळांच्या स्वागत मिरवणुकीच्या सुरू होण्यापूर्वी म्हणजे सायंकाळी साडेपाचला टॉवर चौकात आरती झाली. स्नेहल प्रतिष्ठान या मंडळाच्या "पिंप्राळाचा राजा' सन्मुख लक्ष्मण- आशा आबोटे, दिलीप- लक्ष्मीबाई पवार, प्रकाश- अलका खैरनार, भीमराव- लक्ष्मीबाई अहिरे व रवी- लक्ष्मीबाई संकत या पाच जोडप्यांच्या हस्ते मानाची आरती करण्यात आली. समाजातील दुर्लक्षित घटकातील वर्गाला आरतीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. याप्रसंगी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे सचिन नारळे, किशोर भोसले, स्नेहल प्रतिष्ठानचे अजिंक्‍य देसाई, प्रकल्प प्रमुख दीपक दाभाडे, राहुल परकाळे यांच्यासह सुरेश दायमा, राकेश लोहार, दीपक जोशी, रवींद्र नेरपगारे, पितांबर कोळी, भूषण शिंपी, घनश्‍याम शर्मा, धनंजय चौधरी, संदीप दाभाळे, विक्‍की मिस्त्री आदी उपस्थित होते. 
 

loading image
go to top