मनपाची नजर आता अनधिकृत बांधकाम झालेल्या तळघरांवर !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 मार्च 2020

जळगाव :  चार वर्षापूर्वी महापालिकेच्या नगररचना विभागाने शहरातील मुख्य रस्त्यांवरील इमारतीच्या तळघर तसेच पार्किंगच्या जागेचे सर्वेक्षण केले होते. यात अनेक ईमारतीच्या तळघर हे वाहनतळ (पार्किंग) दाखवून त्याचा आता व्यवसाकीय वापर होत असल्याचे दिसून आले. त्यानुसार आज महात्मा गांधी रोडवरील पार्किंगच्या जागेवर बांधण्यात आलेले अनधिकृत बांधकाम पाडण्याचे सकारण आदेशनूसार हे बांधकाम पाडण्याची कारवाई अतिक्रमण निर्मूलन विभाग, नगरचना विभागाने केली. 

शहरात गेल्या दिड-दोन महिन्यापासून शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याची मोहिम महापालिकेकडून सुरू केली आहे. त्यानुसार शहरातील अनेक रस्त्यांवर लागलेले हॉकसर्च, टपऱ्या ंचे अतिक्रमण काढण्याची कारवाई झालेली आहे. महापालिकेने आता शहरातील ईमारतींमध्ये विनापरवागी तळघरात केलेल्या अतिक्रमणावर कारवाई आज पासून सुरू केली आहे. आज दुपारी महात्मा गांधी रोड महापालिकेच्या समोरील मुख्य रस्त्यावरील अनधिकृत तळघरातील व्यवसायीक वापर होणाऱ्या बांधकामे तोडण्याची कारवाई उपायुक्त अजित मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. 

शहरात 450 अनधिकृत तळघरांचा वापर 
व्यवसायिक वापर करणाऱ्या शहरातील 450 मिळकतधारकांना नोटीस बजावण्यात आल्या असून 243 मिळकतधारकांची सुनावणी घेवून देशपांडे मार्केट, नाथप्लॉजा, गोधडीवाला मार्केट येथील 37 मिळकतधारकांना करावाईचे सकारण आदेश बजावण्यात आले आहे. अनधिकृत तळघरांचा वापर होत असल्यामध्ये खासकी व्यापारी संकुले, हॉस्पीटलचे प्रमाण अधिक आहे. 

कापड दुकानावर कारवाई 
महात्मा गांधी रोडवरील एका कपड्यांच्या शोरुमच्या इमारतीत पार्किंगच्या जागेवर बांधण्यात आलेल्या गोडाऊनचे अनधिकृत बांधकामावर कारवाई उपायुक्तांच्या उपस्थित झाली. यावेळी नगररचना विभागाचे इस्माईल शेख, अतुल पाटील, अतिक्रमण अधिक्षक एच. एम. खान यांच्यासह पथक गेले होते. दरम्यान, व्यावसायिक वापरासाठी गोडाऊनचे अनधिकृत बांधण्यात तोडण्यात आले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon The hammer of the corporation now on the unligaly basement