Video तपस्वी हनुमान मंदिरात अखंड पुजा अर्चा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 एप्रिल 2020

कोरोनामुळे अगदी साधेपणाने म्हणजेच नित्याची आरती करून जयंती साजरी झाली. या जयंतीला ना भाविकांना प्रसाद मिळाला ना दर्शन घेता आले. आजही ही अखंड सेवा येथील पुजारी करत आहेत. 

जळगाव : शहरातील शाहूनगर परिसरात असलेले तपस्वी हनुमान मंदिरात आजही नित्याचीच पुजा अर्चा होत आहे. लॉकडाऊन सुरू असला तरी संकटमोचन हनुमानाच्या दर्शनाला किंवा आरती भाविक येवू शकत नसले तरी तेथील पुजारीकडून अखंड पुजा सुरू आहे. 

शाहूनगर हा परिसर हिंदू- मुस्लिम एकत्र राहणारा आहे. शाहूनगराची सुरवात होतानाच तपस्वी हनुमान मंदिर आहे. नेहमी येथे भाविकांची गर्दी असते. तर हनुमान जयंतीला मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येत असते. गेल्या आठवड्यात हनुमान जयंती झाली. मात्र कोरोनामुळे अगदी साधेपणाने म्हणजेच नित्याची आरती करून जयंती साजरी झाली. या जयंतीला ना भाविकांना प्रसाद मिळाला ना दर्शन घेता आले. आजही ही अखंड सेवा येथील पुजारी करत आहेत. 

रोज पूजा-अर्चना 
या स्थितीतही मंदिरात संकटमोचक हनुमानाचे भाविक येवू शकत नाही. परंतु परिसरातील नागरीक कोरोनाचे संकट दूर सारण्याची प्रार्थना संकटमोचक हनुमानाला मनोमन करत आहे. मात्र पहाटे आणि सायंकाळी बजरंगबलीची आरती आणि पुजा मंदिरातील पुजारी करतात. यानंतर हनुमान चालिसाचे पठण केले जाते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon hanuman tempal dealy puja lockdown