पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत 

पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत 

भुसावळ : मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यात मध्य रेल्वे विभागातील आठ गाड्या रद्द तर नऊ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. तर काही गाड्या उशिराने धावत आहे. त्यामुळे प्रवाशांसह चाकरमान्या वर्गात अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

पावसामुळे ४ रोजी २२१०१ डाउन मुंबई मनमाड राज्यरानी एक्सप्रेस, ११०८१ डाउन गोरखपूर एक्सप्रेस, १२०७१ डाउन दादर जालना जनशताब्दी एक्सप्रेस, ५ रोजी १७६१७ डाउन तपोवन एक्सप्रेस, २२१०२ डाउन राज्यरानी एक्सप्रेस, ५११५३ डाउन मुंबई भुसावळ पॅसेंजर, १२०७२ अप जालना दादर राज्यरानी एक्सप्रेस तर ६ रोजी ११०८२ अप गोरखपूर एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. तसेच ३ रोजी १५०१८ अप काशी एक्सप्रेस नाशिक रोड स्टेशन पर्यंत चालविण्यात आली. १२१४० अप सेवाग्राम एक्सप्रेस ठाणे पर्यंत चालविण्यात येईल. तर ४ रोजी १२१३९ डाउन सेवाग्राम एक्सप्रेस ठाणे ते नागपूर दरम्यान जाईल. ११४०१ डाउन नंदीग्राम एक्सप्रेस मनमाड ते नागपूर पर्यंत, ११४०२ अप नंदीग्राम एक्सप्रेस मनमाड पर्यंत, १७६१८ अप तपोवन एक्सप्रेस नाशिक रोड पर्यंत चालविण्यात आली. ५ रोजी १२३३६ डाउन भागलपुर एक्सप्रेस नाशिक रोड ते भागलपुर दरम्यान जाईल. १५०१७ डाउन गोरखपूर एक्सप्रेस इगतपूरी ते गोरखपूर दरम्यान चालविण्यात येईल. ९ रोजी १२३३५ अप काशी एक्सप्रेस नाशिक रोड पर्यंत जाईल. 

उशिराने धावणाऱ्या गाड्या 
४ रोजी सुटणाऱ्या गाड्यांमध्ये ११०६१ पवन एक्सप्रेस १२.१५ ऐवजी सायंकाळी सातला रवाना झाली. ११०७१ कामायनी एक्सप्रेस १२.४० ऐवजी सायंकाळी साडे सातला रवाना झाली. २२२२१ राजधानी एक्सप्रेस दुपारी ४.१० ऐवजी सायंकाळी सातला रवाना झाली. १२१०७ एलटीटी लखनऊ सुपरफास्ट एक्स्प्रेस दुपारी ४.२५ ऐवजी रात्री सायंकाळी ७. ४५ ला रवाना झाली. ११०५४ एलटीटी आजमगड एक्सप्रेस दुपारी ४.४० ऐवजी रात्री ८.५ वाजता, १२१०५ विदर्भ एक्सप्रेस रात्री ७ ऐवजी सव्वा दहाला, १२८०९ पंचवटी एक्सप्रेस सायंकाळी सव्वा सहा ऐवजी रात्री दहाला, १२१३७ पंजाब एक्सप्रेस रात्री ७.३५ ऐवजी रात्री साडे दहाला रवाना झाली. १२२८९ दुरांतो एक्सप्रेस सव्वा दहा ऐवजी रात्री सव्वा अकराला रवाना होईल. १२१११ मुंबई अमरावती एक्सप्रेस ७.५५ ऐवजी रात्री सव्वा दहाला, १२८०९ मुंबई हावडा सुपरफास्ट वाया नागपूर साडे आठ ऐवजी सव्वा बाराला रवाना झाली. १२३२२ मुंबई हावडा सुपर फास्ट वाया अलाहाबाद साडे नऊ ऐवजी ५ रोजी पहाटे ३.४५ वाजता रवाना झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com