अरे व्वा.. "लॉकडाऊन'मध्ये अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्यांना  घरबसल्या ई-पास !

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 एप्रिल 2020

ई पास संबंधी कागदपत्रे ऑनलाईनच आरटीओ विभागाला सादर करावी लागतील. त्यांनी कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांचे व्हेरिफिेकेशन झाल्यानंतर लागलीच ई-पास मिळणार आहे. 

जळगाव ः जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीत आर.टी.ओ.विभागातर्फे अत्यावश्‍यक सेवांना पास दिल्या जातात. आतापर्यंत 889 पासेस देण्यात आल्या आहेत. उद्यापासून (ता.5) अत्यावश्‍यक सेवेतील नागरिकांना घरबसल्या ई-पास देण्याचा उपक्रम सुरू करीत असल्याची माहितीसहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी दिली. 

लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या मालवाहू वाहनांना ई पास आता घरच्या घरी मिळणार आहे. त्यासाठी संबंधितांना ई पास संबंधी कागदपत्रे ऑनलाईनच आरटीओ विभागाला सादर करावी लागतील. त्यांनी कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांचे व्हेरिफिेकेशन झाल्यानंतर लागलीच ई-पास मिळणार आहे. 

अशी आहे ई पास मिळविण्यासाठी पद्धत 
https://transport.maharashta.gov.in साईट ला भेट द्यावी. नंतर 
Apply for e pass goods vehicle select करावे, नंतर RTO where to apply ठिकाणी एमएच- 19(जळगाव) सिलेक्‍ट करावे. 
वाहन मालक नाव नोंदवावे. वाहन चालक (driver) नाव नोंदवावे. वाहन चालकाचा वैध लायसन्स क्रमांक नोंदवावा. वैध मोबाईल क्रमांक नोंदवावा (चालक /मालक) व ई-मेल आय.डी., वाहन क्रमांक नोंदवावे. 
वाहनाचे चेसिस क्रमांक शेवटचे 5 आकडे द्यावेत. वाहनाचा प्रकार नोंदवावा. 
कोणत्या प्रकारचे माल वाहून नेणार आहे ते नोंदवावे (उदा. Vegetable /grain/groceries ) माल वाहून नेण्यासाठी मार्ग नमूद करावा (उदा. जळगाव ते मुंबई आदी). ई-पास कालावधी नमूद करावा. एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी नसावा (दिलेल्या तारखेमधून निवडावा). 
Word verification character भरून ऍप्लिकेशन सबमिट करावे. 
ई-पाससाठी application reference number generate होईल. उपरोक्त अँप्लिकेशन क्रमांक नुसार आरटीओ ऑफिसने ऍप्रुव्हल केल्यानंतर आपल्या वाहनाचा ई पास जनरेट होईल. तो "पीडीएफ' स्वरूपात अर्जदाराच्या मेल "आयडी' वर पाठवण्यात येईल. त्याची अर्जदाराने प्रिंट काढून घ्यावी. अधिक माहितीसाठी कार्यालयीन दूरध्वनी 0257 2261819 किंवा Email -mh19@mahatranscom.in 
यावर संपर्क साधावा. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Home e-pass to those who provide essential service in "Lockdown"!