राज्यात बागायती पेरण्या रखडणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 मे 2020

कृषी आयुक्तांनी बियाणे विक्रीस पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती दिली आहे. जिल्ह्यात 8 लाख 77 हजार बी.टी.कापूस बियाणे दाखल झाले आहे. आयुक्तांनी बियाणे विक्रीवरील बंदी उठवताच शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध होतील. 
-संभाजी ठाकूर, 
कृषी अधीक्षक कृषी अधिकारी.

जळगाव : पुणे कृषी आयुक्तांनी बियाणे विक्री थांबविण्याचे पत्र राज्यातील सर्व कृषी अधीक्षकांना दिल्याने राज्यात बियाणे विक्री थांबली आहे. एक मे पासून राज्यात बियाणे विक्रीस सुरवात होणार होती. 
परंतु या आदेशाने आता बागायती कपाशीच्या पेरण्या लांबणार असल्याचे चिन्हे आहेत. 
राज्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहे. यामुळे देशभरात लॉकडाउन सुरू आहे. लॉकडाउनमधून शेती कामांना, शेतमाल विक्रीस परवानगी दिली आहे. मे महिन्याच्या सुरवातीस बागायतदार शेतकरी कापसाच्या पेरण्या करतात. तर कोरडवाहू शेतकरी मे महिन्याच्या वीस तारखेनंतर शेतात, नांगरणी करून काडी कचरा वेचणीचे कामे करण्यावर भर देतात. ऐनवेळी बियाणे न मिळाल्यास अनेकजण बियाणे खरेदी करूनही ठेवतात. 
यंदा पाऊस चांगला होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. यामुळे एक मेपासून राज्यात बियाणे विक्री सुरू होणार होती. 
शेतकऱ्यांना फिजिकल डिस्टन्स पाळण्याची झंझटीतून सूट म्हणून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे पोचविण्याचे नियोजन कृषी विभागातर्फे करण्यात आले होते. 
त्यादृष्टीने जिल्ह्यात 8 लाख 77 हजार बी.टी.बियाण्यांची पाकिटेही दाखल झाली आहेत. ज्वारी, सोयाबीनचे बियाणेही दाखल झालेले आहे. विविध प्रकारचे 24 हजार मेट्रिक टन खतेही आली आहेत. मात्र बियाणे विक्री पुढील आदेश येई पर्यंत न करण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी काढल्याने बियाणे विक्री बंद आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Horticulture sowing will be stopped in the maharashtra state