esakal | "शिवभोजन' केंद्रातर्फे पॅकींगद्वारे भोजन वाटपाची अंमलबजावणी 

बोलून बातमी शोधा

"शिवभोजन' केंद्रातर्फे पॅकींगद्वारे भोजन वाटपाची अंमलबजावणी 

सर्व बंद असताना शिवभोजन केंद्रातून पॅकींगद्वारे भोजन शासनाने दिल्याने गरजूंनी आभार व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील कैलास कोल्ड्रिंक्‍स यांना मंजुरी थाळी 75 चे पार्सल करून सरकारी दवाखाना परिसर येथे जाऊन वाटप करावयाचे होते.

"शिवभोजन' केंद्रातर्फे पॅकींगद्वारे भोजन वाटपाची अंमलबजावणी 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश असले तरी जिल्हा रुग्णालयातील रुग्ण, बेसहारा व्यक्ती अशांना शिवभोजन पॅकिंग करून वाटपाचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काल काढले होते. त्यानूसार आजपासून बहुतांश शिवभोजन केंद्रातर्फे भोजनाची थाळी पॅकिंग करून गरजूंना वाटप केल्याचे दिसून आले. 


गोलाणी मार्केटमधील युवा नामदार बहूउद्देशिय संस्थेतर्फेसकाळी अकरापासून शिवभोजनाची थाळी कागदाच्या पॅकिंगमध्ये बांधून वाटप करण्यात आली. थाळी पॅकिंग देताना तोंडाला मास्क बांधण्यात आला, शिवभोजन घेणाऱ्यांनाही मास्क बांधूनच थाळी घेऊन इतर ठिकाणी वेगवेगळेपणे भोजन घेतले. यामुळे गरजूंचा एकमेकांशी संपर्क आला नाही. पॅकिंग देताना अंतर राखूनच देण्यात आल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता येण्यास मदत झाल्याची माहिती शिवभोजन केंद्राचे संचालक परवेझ पठाण यांनी दिली. माथाडी कामगार, लोटगाडीवर काम करणाऱ्या गरजूंनी सकाळीच येऊन शिवभोजनाची मागणी केली. त्यांना अकरापासून शिवभोजन पॅकिंग करून देण्यात आले. सुमारे शंभर लाभार्थ्यांना याचा लाभ देण्यात आला. 


सर्व बंद असताना शिवभोजन केंद्रातून पॅकींगद्वारे भोजन शासनाने दिल्याने गरजूंनी आभार व्यक्त केले. 
जिल्हाधिकारी कार्यालयातील कैलास कोल्ड्रिंक्‍स यांना मंजुरी थाळी 75 चे पार्सल करून सरकारी दवाखाना परिसर येथे जाऊन वाटप करावयाचे होते. थाळी वाटप करताना गर्दी होणार याची दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहे. 


शिवभोजन थाळी पार्सल मधून वाटपाबाबत सर्व शिवभोजन केंद्र चालकांना आदेश दिले आहेत. गरीब गरजू व्यक्तीचा फोटो काढणे त्याचे नावे रजिष्टरमध्ये लिहिणे असेही आदेशित करण्यात आले आहे.