आयुर्वेदीक महुफुलांचा हंगाम बहारला.. विविध आजांरावर आहे गुणकारी औषध

आयुर्वेदीक महुफुलांचा हंगाम बहारला.. विविध आजांरावर आहे गुणकारी औषध

वार्सा : मोहगाव ता.साक्री येथे व परिसरात महुफुलांचा हंगाम चालु असुन महु फुलांना सालाबादप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात बहार आला आहे. परंतू महुचे फुले केवळ दारू बनविण्यासाठी याचा उपयोग होत नाही, तर अनेक आजारांवर देखील ही फुले औषधी म्हणून वापरतात.

साक्री- तालुक्यातील पिंपळनेर च्या पश्चिम पट्टयात डोंगर द-या, कपा-यात, डोंगरावर जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर महुची झाड आहेत. व ती सध्या मार्च व एप्रिल महिन्यात महू फुलांनी बहरली आहेत त्यामुळे महू फुलांचा सुगंध परिसरात दरवळू लागला आहे तसेच महू फुलांचा वेचणीतुन आदिवासी बाधवांना रोजगार उपलब्ध होत आहे. तसेच काही शेतक-यांच्या शेतातील बांधावर व खाजगी जागेत महू फुलांचे झाडे आहेत उन्हाळा सुरु झाल्याने पानगळ होऊन महू फुलांच्या झाडांना बहर येवू लागतो.
साक्री तालुक्यातील पिंपळनेर च्या पश्चिम पट्टा महू फुलांनी बहरून गेला आहे. 

आदीवासी बांधवांना रोजगार

पहाटे पक्क महू फुलांची गळण होते. सकाळी सर्वत्र 
जंगल परिसरात महुफुलांच्या झाडांन खाली महु फुले वेचणी करतांना आदिवासी बांधव ठिक ठिकाणी महू फुलांची वेचणी करतांना दिसून येत आहेत या महू फुलांचा वेचणी तुन अनेकांना रोजगार मिळाला आहे. 

महुचे फुले आजारांवर प्रभावी औषधी

महुचा फुलांचा उपयोग केवळ दारु बनविण्यासाठीच होतो असे अनेकांना माहिती आहे. परंतू महु फुलांचे आयुर्वेदात मोठे महत्व आहे. महू फुलांचा भाजीसह खाद्यपदार्थ तसेच आजरांवर उपचारा साठी औषध म्हणून उपयोगात आणतात. आजारपणात तोंडाला चव यावी म्हणून उसळ खातात खोकला, पोटदुखी आजारावर महू फुले गुणकारी आहेत, भाकरीच्या पिठात सुकलेली महू फुले टाकुन खाल्यास शांत झोप येते या महू फुलांच्या सेवनाने खोकलाही नष्ट होतो.

डबल उत्पादन देणारा वृक्ष
महु वृक्ष हा डबल उत्पादन देणारे एकमेव वृक्ष असुन महुवृक्ष फुले देतो आळी फळे देतो. फुलां पासुन दारू (मद्य) तर फळांन पासुन आयुर्वेदिक औषधी खाद्य तेल देत. फुले संपले की टोळमी लागते नंतर ती पीकली का त्या फळातून बदामापेक्षा थोडी मोठी बी निघते व ती सुकवून तेल घान्यात पिळुन तेल काढून घेतात.

येथे महुचे फुले वेचली जातात

पश्चिम पट्टयात अनेक गावात महु फुले मोठ्या प्रमाणात वेचली जातात व विक्री देखील केली जातात त्यात प्रामुख्याने मोहगाव, शेंदवड, चावडीपाडा, पिंपळपाडा, वडपाडा, केवडीपाडा, बारिपाडा, मोगरपाडा,मांजरी, वार्सा, सिताडी, काळांबा, धसकल, चोरवड, मळगाव, खरगाव, पारसरी, चरणमाळ, नांदरखी, बसरावळ, अश्या अनेक गावे आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com