जळगाव जिल्ह्यात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह...कोरोनाग्रस्तांची संख्या एकतीसवर ! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 एप्रिल 2020

जळगाव जिल्हा गेल्या दहा ते पंधरा दिवसापूर्वी 2 ते 3 रुग्णसंख्या होती. परंतू अचानक कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून त्यात अमळनेरला मोठ्या प्रमाणात संख्या वाढली आहे.

जळगावः जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने जळगाव जिल्ह्यातील परिस्थिती आता चिंताजनक झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्णांपैकी 
54 व्यक्तीचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. त्यापैकी "सात' रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर 47 संशयित रुग्णाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

जळगाव जिल्हा रेड झोन मध्ये गेला असून सर्वांत जास्त कोरोनाची संख्या अमळनेर शहरात आहे. त्यात आज पुन्हा वाढ होत "कोरोना' बाधित सात रुग्णांपैकी चार रुग्ण अमळनेरच असून जळगाव, पाचोरा व भुसावळ च्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण यापूर्वी आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील आहे अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे. 

जिल्ह्याची कोरोनाची संख्या 31 वर 
जळगाव जिल्हा गेल्या दहा ते पंधरा दिवसापूर्वी 2 ते 3 रुग्णसंख्या होती. परंतू अचानक कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून त्यात अमळनेरला मोठ्या प्रमाणात संख्या वाढली आहे. त्यानंतर भुसावळ तसेच जळगाव शहरात देखील रुग्णसंख्या वाढल्याने जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकतीस इतकी झाली आहे. 

जिल्हा पुन्हा हादरला 
अमळनेर येथे एका महिले पासून सुरवात झालेली कोरोनाची संख्या वाढत आहे. त्यामुळे अमळनेर शहराची चिंता अधिकच वाढलेली आहे. त्यात भुसावळ शहरात आधी सोमवारी तीन होती तर आज एकाची पुन्हा वाढ झाली आहे. तसेच जळगाव शहर व पाचोरा मध्ये अजून एक रुग्णाची वाढ झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon jalgaon district, the reports of seven people are positive