जास्तीचे पैसे देऊनही "जेसीबी' मिळेना! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

जळगाव : जिल्ह्यासह शहरात शासकीय योजनांची कामे सुरू आहेत. तसेच पावसाळ्यापूर्वीच शेतांमधील कामांना देखील सुरवात झाली असून, ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी नागरिकांकडून "जेसीबी' भाड्याने घेतली जात आहेत; परंतु या कामांसाठी नेहमीपेक्षा अधिक पैसे देऊन देखील "जेसीबी' भाडेतत्त्वावर मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरातील "जेसीबी'चालकांची चलती आहे, असे म्हणणेही वावगे ठरणार नाही. 

जळगाव : जिल्ह्यासह शहरात शासकीय योजनांची कामे सुरू आहेत. तसेच पावसाळ्यापूर्वीच शेतांमधील कामांना देखील सुरवात झाली असून, ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी नागरिकांकडून "जेसीबी' भाड्याने घेतली जात आहेत; परंतु या कामांसाठी नेहमीपेक्षा अधिक पैसे देऊन देखील "जेसीबी' भाडेतत्त्वावर मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरातील "जेसीबी'चालकांची चलती आहे, असे म्हणणेही वावगे ठरणार नाही. 
जिल्ह्यात सर्वत्र रस्त्यांसह अनेक विकासकामे सुरू झाली असून, पावसाळ्यापूर्वी शेतातातील कामांना देखील सुरवात झाली आहे. तसेच लहान खेडेगावांसह शहरात नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. त्याचप्रमाणे राज्यभरात वॉटरकप स्पर्धा सुरू असल्याने ही सर्व कामे करण्यासाठी "जेसीबी'ला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शहरात सुमारे 50 जेसीबी असून, प्रति तास काम करण्यासाठी "जेसीबी'चे भाडे हे 600 ते 650 रुपये इतके आकारले जात असते; परंतु सध्या सर्वत्र सुरू असलेली कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लावावी लागत असल्याने ही कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. ही कामे पाऊस पडण्याआधी पूर्ण करण्यासाठी शासकीय कंत्राटदारासह शेतकरी अधिक पैसे देऊन देखील जेसीबी मिळत नसल्याची माहिती शहरात सुरू असलेल्या कामावरील कंत्राटदारांनी दिली. 

तातडीच्या कामांसाठी हजार रुपये तास 
शहरासह जिल्ह्यात शासकीय कामांना वेग आला आहे. यातच आता घरे बांधणे यासह खोदाईची कामे देखील सुरू आहे. त्यामुळे "जेसीबी'ला मागणी असल्याने कामे त्वरित करण्यासाठी "जेसीबी'च्या मालकांकडून कामानुसार त्याच्याकडून प्रतितास हजार रुपये घेतले जात आहे. 

"डे-नाईट'च्या कामांसाठी जास्तीचे पैसे 
जिल्ह्यात सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी ही कामे दिवसा व रात्रपाळी या दोन्ही शिप्टमध्ये सुरू आहे. यातच शासकीय कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदारांना दिलेल्या असल्याने ही कामे पूर्ण करून घेण्यासाठी कंत्राटदार ही कामे पूर्ण करण्यासाठी "जेसीबी'च्या साहाय्याने पूर्ण करत असल्याने त्यासाठी त्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहे. 

असे आहेत "जेसीबी'चे दर 
जेसीबी मालक शासकीय कंत्राटदारांची कामे करण्यासाठी त्यांच्याकडून 700 रुपये प्रतितास तर खासगी कामांसाठी 800 ते 850 रुपये प्रतितासाप्रमाणे वसूल केले जात आहे. तसेच "अर्जंट' काम करण्यासाठी त्याठिकाणी असलेल्या कामानुसार "जेसीबी'मालक हजार रुपये तास देखील घेत आहेत. 
 
"जेसीबी'मुळे खोदाई किंवा इमारत पाडण्याचे काम काही तासांत पूर्ण होते. तसेच सध्या सर्वत्र कामांची रेलचेल सुरू असल्यामुळे "जेसीबी'ला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. "अर्जंट' कामांसाठी सुरू असलेले काम बंद करून दुसरे काम करावे लागते. त्यामुळे "सीझन'मध्ये जेसीबीचे भाडे अधिक असते. 
- नितीन शिंदे, "जेसीबी'मालक. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon JCB no avalabel