esakal | जिल्ह्यात दोन महिने एवढा पुरेल एवढा किराणा, अन्नधान्य  : जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे
sakal

बोलून बातमी शोधा

kirana

नागरिक किराणा दुकानांवर गर्दी करताना दिसतात, गरज नसताना अवाजवी किराणा घेत आहेत. जिल्ह्यातील नागरिकांना किमान दोन महिने पुरेल एवढा किराणा, अन्नधान्य, भाजीपाला आहे. यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता अवाजवी किराणा घेण्यासाठी गर्दी करू नये.

जिल्ह्यात दोन महिने एवढा पुरेल एवढा किराणा, अन्नधान्य  : जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : कोरोनो' संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात तर महाराष्ट्रातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लॉक डाउनची घोषणा केली आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरिक किराणा दुकानांवर गर्दी करताना दिसतात, गरज नसताना अवाजवी किराणा घेत आहेत. जिल्ह्यातील नागरिकांना किमान दोन महिने पुरेल एवढा किराणा, अन्नधान्य, भाजीपाला आहे. यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता अवाजवी किराणा घेण्यासाठी गर्दी करू नये. कोरोना'वर उपाय एकच आहे घरी बसा, तो काटेकोरपणा पाळा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले. 

पालकमंत्री गुलाबराव पाटील,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, महापालिकेचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी म्हणाले,की विविध ठिकाणी किराणा सामान घेण्यासाठी गर्दी होताना दिसते. नागरिकांनी एकावेळी गर्दी करू नये. सामान घेतानाही गरज असेल तेवढेच घ्यावे. लॉक डाऊनमध्ये किराणा सामानाची दुकाने, भाजीपाला, फळे, दूध, मेडिकल, रुग्णालये सुरूच राहतील. उगाच आपल्याला नंतर भेटणार नाही याची काळजी करू नये. जिल्ह्यात भरपूर अन्नधान्य, भाजीपाला आहे. यामुळे जीवनावश्‍यक वस्तू घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहू नका. जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न हा आहे की नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात येऊ नये. संपर्कात न आल्यास कोरोनो'चा संसर्ग होणार नाही. यामुळेच देशभरात लॉकडाउनचे आदेश आहे. 21 दिवसांचा लॉकडाउन असताना सर्वांना धान्य, भाजीपाला, फळे, दूध, जीवनावश्‍यक पदार्थ उपलब्ध होतील याची काळजी प्रशासन घेत आहे. नागरिकांनी घरे बसावे बाहेर पडू नये. 

जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई 
देश कोरोनाच्या संकटात आहे. ही वेळ इतरांना सेवा देण्याची आहे. त्यांच्याकडून जादा दर घेऊन त्यांना लुटण्याची नाही. यामुळे जीवनावश्‍यक वस्तू विक्रेत्यांनी जादा दराने वस्तूची विक्री करू नये, साठे बाजी करू नये. लवकरच अशा विक्रेत्यांवर आमचे पथके छापे टाकून संबंधित वस्तूंचा निर्धारित दर काय आहे ? तिची विक्री कितीला होते ? याबाबी तपासल्या जाणार आहे. त्यात जर निर्धारित रक्कमेपक्षा अधिक दर आकारल्याचे दिसून आल्यास संबंधितावर आपत्तीकालीन व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. 

मास्कची किमत 8 रुपये 
निर्धारित किमतीनुसार तोंडाला लावायची मास्कचा दर 8 रुपये तर सॅनेटायझरची 100 "एमएल'ची किंमत 50 रुपये आहे. त्यापेक्षा अधिक दराने विक्री झाल्यास संबंधित विक्रेत्यावर कारवाई केली जाईल. 

31 ठिकाणी चेकपोस्ट 
जिल्ह्यात सीमा बंदीचे आदेश दिलेले आहेत. त्यात 31 ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. अत्यावश्‍यक सेवा वगळता इतरांना इकडून तिकडे जाऊ दिले जात नाही व येऊही दिले जात नाही. 

loading image