esakal | पैसे दे वरना... बेटी को उठाके धंदे पे बेठाऊंगी !

बोलून बातमी शोधा

poor woman imege

लेडी डॉन असलेल्या बिल्कीस हिने तीन चार जणांसोबत रात्रीच्या वेळी लोढा यांचे घर गाठून पैसे देण्याची मागणी केली. तसेच पैसे दिले नाही तर मुलीला उचलून घेवून जाईल नाहीतर मुलीसह तुझ्या चेहऱ्यावर ऍसिड फेकून देवून जीवाने ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला.

पैसे दे वरना... बेटी को उठाके धंदे पे बेठाऊंगी !
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मैत्रिणीला आवश्‍यकता असल्याने भावना जवाहरलाल लोढा (वय 37 रा.अयोध्यानगर) यांनी बिल्कीस पटेल हिच्याकडून पैसे घेवून दिले. पैसे करतांना व्यवहाराचे बंधपत्र व कोरा चेक यांनी पटेल या महिलेला लोढा यांनी पैसे घेतेवेळी दिला. घेतलेले पैसे परत केल्यावर कोरा चेक व बंधपत्र करण्याची मागणी केली असता, बिल्कीस हिने ऊसनवार घेतलेल्या पैशांपेक्षा जास्तीच्या पैशांची मागणी करुन संबंधित दस्तऐवज देण्यास नकार दिला. यानंतरही या लेडी डॉन असलेल्या बिल्कीस हिने तीन चार जणांसोबत रात्रीच्या वेळी लोढा यांचे घर गाठून पैसे देण्याची मागणी केली. तसेच पैसे दिले नाही तर मुलीला उचलून घेवून जाईल नाहीतर मुलीसह तुझ्या चेहऱ्यावर ऍसिड फेकून देवून जीवाने ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला. धमकीनंतर भितीपोटी लोढा यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली असून त्यावरुन पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

अयोध्यानगरात भावना लोढा ह्या आई, मुलगी तसेच मुलासह वास्तव्यास आहेत. अयोध्यनगरातील पोल फॅक्‍टरीजवळ लेडीज कटलरी साहित्याचे दुकान आहे. लोढा यांची मैत्रिण संगीता निरज जोशी रा. आदर्शनगर मोहाडी रोड हिने तिचे मालकीचे घर आदिल पटेल (रा.तांबापुरा) यांना 11 महिन्यांसाठी 4 लाख रुपयांमध्ये ताबेगहाण ठेवले आहे. या व्यवहारावेळी आदिल पटले यांच्याकडून त्यांची बहिणी बिल्कीस पटेल तर संगीता हिच्याकडून भावना लोढा या साक्षीदार होत्या. 1 रोजी मैत्रिण संगीता हिस पैशांची आवश्‍यकता होती. यासाठी संगीताने लोढा यांना पैसे देण्याची विनंती केली. त्यानुसार लोढा यांनी त्यांच्या परिचयाच्या मुमताज तडवी हिच्याकडून 80 हजर , शबनम बाबु तडवी यांच्याकडून 2 लाख 70 हजार व बिल्कीस पटले यांच्याकडून 1 लाख असे एकूण 4 लाख 50 हजार रुपये हात ऊसनवारीवर घेवून दिले. 

क्‍लिक कराः PHOTO होय. मीच बसवला शिवरायांचा पुतळा...म्हणत महिला ठिय्या 
 

महिला, मुलीसह आईला मारहाण, धमकी 
पैसे घेतांना लोढा यांनी शपथपत्र हिलून घेतले तसेच त्याच्या नावाचा शिरपुर बॅंकेचा कोरा चेक स्वाक्षरी करुन पैसे घेणाऱ्या व्यक्तींना दिला होता. 13 फेब्रुवारी रोजी संगीता हिने 1 लाख रुपये लोढा यांना परत दिले. लोढा यांनी ते ऊसनवारीने घेतलेले बिल्कीस यांना परत केले. यावेळी बिल्कीस पटेल हिने दिलेल्या पैशांपेक्षा जास्तीच्या पैशांची मागणी केली. लोढा यांनी नकार दिल्यावर वाढीव पैसे देण्यासाठी वारंवार फोनवरुन धमकाविले. 

नक्की वाचा : सावधान...मिठाई स्वरूपात शरीरात शिरतेय स्विट पॉयझन
 

16 फेब्रुवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास बिल्कीस पटेल हि तिच्यासोबत चार ते पाच जणांना सोबत घेवून आली. तिला सकाळी बोलू असे सांगितल्यावर तिने आत्ताच बोलायचे म्हणत बंद केलेला दरवाजा जबरदस्तीने उघडून घरात प्रवेश केला. यावेळी जास्तीचे पैशांची मागणी करुन पैसे देणार नाही असे लोढा यांनी सांगितल्यावर बिल्कीस हिने अगर मुझे पैसे नही दिये तो तेरी बेटी को उठा के ले जाऊंगी और धंदे पे बिठाऊंगी, नही तो तुम दोनो के मुह पे ऍसिड फेकूंनी और जान से मार दूंगी अशी धमकी देवून शिवीगाळ केली. भावना यांच्यासह त्यांच्या मुलीला चापटा बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. याचवेळी पटेल हिच्या सोबतच्यांनी भावना यांच्या आईच्या अंगावर खुर्ची मारुन फेकून मारत गोंधळ घातला. यानंतर सर्व गल्लीत गोंधळ घालत शिवीगाळ करत निघून गेले. याप्रकरणी भावना लोढा यांनी 17 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून बिल्कीस पटेल हिच्यासह पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.