"लॉकडाऊन' मध्ये झाली पक्षीगणना...सातशे एकोनसत्तर पक्ष्यांची नोंद 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

पक्षी गणनेत आढळलेल्या 40 जातीच्या पक्ष्यांमध्ये 39 प्रकारचे स्थानिक पक्षी असून फक्त 1 गुलाबी मैना हा पक्षी विदेशी स्थलांतरीत होता.

जळगाव : निसर्गमित्रतर्फे "लोकडाऊन' मध्ये कोविड 19 मध्ये तीन दिवसीय पक्षी गणणा हा उपक्रम घेण्यात आला. या पक्षी गणना उपक्रमात शहरात 40 जातींच्या 769 पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे अशी माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली. 

कोरोना आजारा बाबत केंद्रातर्फे संपूर्ण देशात लॉकडाऊन पुकारले आहे. लॉकडाऊन काळात घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार 9 ते 11 एप्रिल दरम्यान घेण्यात आलेल्या या पक्षी गणना उपक्रमात सहभाग घेणाऱ्या नागरीकांनी सोशल डिस्टिन्सींग पाळत घराच्या गच्चीवरून, परसबाग, अंगणात येणाऱ्या पक्ष्यांचे निरीक्षण व गणना केली. 

या तीन दिवसांत शिवाजीनगर परिसरात सर्वाधीक 20 विविध पक्ष्यांच्या जातीची नोंद झाली. तसेच एमआयडीसी 16 येथे, श्‍यामनगर 11 येथे तर शिरपूर येथिल महात्मा फुलेनगर मध्ये 16 जातीचे, अमळनेर येथील पटवारी कॉलनी येथे 15 जातीचे पक्षी नोंदवण्यात आल्याची माहिती गाडगीळ यांनी दिली. 

जिल्हा बाहेरून ही मिळाला प्रतिसाद 
पक्षी गणना या उपक्रमाला शहरातून चांगला प्रतिसाद मिळाला यात एमआयडीसी परिसर, गजानन कॉलनी, श्‍यामनगर, पिंप्राळा शिवाजीनगर, मेहरूण या भागातून आणि जळगाव बाहेरील अमळनेर, येथून. यासोबतच जळगाव जिल्हया बाहेरून शिरपूर, नागपूर येथील नरेंद्र नगर, पुणे येथील औंध परिसर कॉलनी आशा ठिकाणाहून प्रतिसाद मिळाला. 

यांनी घेतला सहभाग 
पक्षी निरीक्षण व गणनेत शिल्पा व राजेंद्र गाडगीळ, राजेश गडकर, किशोर पाटील, उमेश जावळे, अनिकेत शिंपी, अनिल शिंपी, राहुल कुंभार, कल्पना साळी, नागपूरचे अनिल बंडे,औंध पुणे येथील रेणुका जोशी इत्यादींनी सहभाग घेतला. 

हे पक्षी अढळून आले 
पक्षी गणनेत आढळलेल्या 40 जातीच्या पक्ष्यांमध्ये 39 प्रकारचे स्थानिक पक्षी असून फक्त 1 गुलाबी मैना हा पक्षी विदेशी स्थलांतरीत होता. स्थआनी पक्षीमध्ये पारवे, चिमणी, गाय बगळा, ढोकरी, लालबुड्या बुलबुल हे पक्षी जास्त संख्येने आढळले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Lockdown 'recorded bird count seven hundred seventy-nine bird records