जळगावात चुरस; रावेरमध्ये भाजपच्या बाजूने: सट्टेबाजाराचा कल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

जळगाव : लोकसभेच्या जळगाव व रावेर मतदारसंघात मतदान झाल्यानंतर राजकीय सट्टा बाजारात दोन्ही जागांसाठी कल भाजपकडे दाखविला जातोय. रावेर मतदारसंघात भाजपचा फक्त 20 पैसे व कॉंग्रेस आघाडीचा दर एक रुपया आहे. तर जळगाव मतदारसंघात मात्र भाजपचा दर 30 पैसे तर राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीचा विजयाचा दर 40 पैसे दाखविला जात आहे. 

जळगाव : लोकसभेच्या जळगाव व रावेर मतदारसंघात मतदान झाल्यानंतर राजकीय सट्टा बाजारात दोन्ही जागांसाठी कल भाजपकडे दाखविला जातोय. रावेर मतदारसंघात भाजपचा फक्त 20 पैसे व कॉंग्रेस आघाडीचा दर एक रुपया आहे. तर जळगाव मतदारसंघात मात्र भाजपचा दर 30 पैसे तर राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीचा विजयाचा दर 40 पैसे दाखविला जात आहे. 
निवडणुकीच्या काळात राजकीय सट्टाबाजार तेजीत असतो. या सट्टेबाजाराचे आपले एक वेगळेच गणित असते. जो उमेदवार निवडून येणार असतो, त्या उमेदवाराचा कमी असतो, तर जो उमेदवार पडणार असतो, त्याचा दर जास्त असतो. जिल्ह्यातील जळगाव व रावेर या दोन्ही जागांसाठी मतदान झाले आहे. जळगाव मतदारसंघात 56.11 टक्के तर रावेर मतदारसंघात 61.40 टक्‍के मतदान झाले. जळगाव मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीचे गुलाबराव देवकर विरुद्ध भाजप सेना युतीचे आमदार उन्मेष पाटील यांच्यात लढत आहे. दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचार केला आहे. मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. त्यामुळे विजय कोणाचा होणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहे. सट्टेबाजारातही दोन्ही उमेदवारांच्या बाबतीत अगदी जवळ-जवळची स्थिती आहे. भाजप-सेना युतीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांचा 30 पैसे तर कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा 40 पैसे दर आहे. मतदान झाल्यानंतरची ही स्थिती असल्याचे सांगण्यात येत आहे. 

रावेरला रक्षा खडसेंना कौल 
रावेर मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे विरुद्ध कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यात लढत आहे. या मतदारसंघात सट्टेबाजारात भाजपकडेच अधिक कल दिसून आला आहे. भाजप-सेना युतीच्या विजयासाठी 20 पैसे तर कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या विजयासाठी एक रुपयाचा दर आहे. सट्टे बाजारातील हे कल मतदान झाल्यानंतर जाहीर झालेल्या टक्केवारीच्या आधारावर असल्याचे सांगण्यात येत आहेत. 
 
असे असते सट्टाबाजाराचे गणित 
सट्टेबाजारात बुकींनी ठरविलेल्या दरावर जय-पराजयाचे अंदाज बांधले जातात. विविध टप्प्यात मतदान पार पडते, त्यानुसार प्रत्येक जागेच्या निकालावर सट्टा लावला जातो. ज्या उमेदवाराचा दर कमी त्याच्या विजयाची शक्‍यता जास्त, ज्याचा दर अधिक त्याच्या विजयाची शक्‍यता कमी, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. राज्य, देश पातळीवर "रालोआ' व "संपुआ' या दोन प्रमुख आघाड्यांना किती जागा मिळतील, त्यावरही सट्टा लावला जातो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon loksabha election sattebajar