कार्बाईडचा करून पिकविली जाताहेत आंबे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

जळगाव: शहरात आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत असून व्यापाऱ्यांकडून आंबे लवकर पिकविण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने नव्हे, तर त्यासाठी शरिरासाठी घातक असलेल्या कार्बाईडसारख्या रसायनांचा वापर सर्रासपणे होत आहे. त्यामुळे बाजारात विक्रीसाठी आलेले आंबे आरोग्यासाठी घातक देखील ठरू शकतात. याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

जळगाव: शहरात आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत असून व्यापाऱ्यांकडून आंबे लवकर पिकविण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने नव्हे, तर त्यासाठी शरिरासाठी घातक असलेल्या कार्बाईडसारख्या रसायनांचा वापर सर्रासपणे होत आहे. त्यामुळे बाजारात विक्रीसाठी आलेले आंबे आरोग्यासाठी घातक देखील ठरू शकतात. याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

उन्हाळ्यात रसाळ फळांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. बहुतांश फळे ही आयात केली जातात. ही फळे पिकण्याआधीच तिची आयात केली जाते. त्यानंतर ती गोदामामध्ये साठवून पिकवले जातात. आता फळांचा राजा आंबा हा देखील बाजारपेठेत दाखल झाला आहे. परंतु दिसायला पिवळा असलेला आंबा हा व्यापाऱ्यांकडून पिकविण्यासाठी कार्बाईडसह इथीनिल रासायनिक पदार्थांचा वापर करीत असल्याने ही फळे आरोग्यासाठी घातक ठरू लागली आहेत. 

अशी आहे आंबा पिकविण्याची घातक पद्धत 
शहरात आंबे विक्रेत्यांच्या गोदामांमध्ये आंबे विक्रेत्यांकडून कैरीला दीड ते दोन दिवस कार्बाईड लावूनकरुन त्याला बंद खोली ठेवले जाते. कार्बाईड टाकल्याने दोन दिवसानंतर कैरीला पिवळा रंग येतो. ती खाण्यालायक बनल्यानंतर त्याची बाजारपेठेत विक्री केली जात असल्याची घातक पद्धत व्यापाऱ्यांकडून वापरली जात आहे. 

कार्बाइडसह ऍसिटिलीन गॅसवर शासनाची बंदी 
कॅल्शिअम कार्बाईड व ऍसिटिलीन गॅस हा शरिरासाठी घातक असल्याने त्याचा वापर करण्यास शासनाने बंदी घातलेली आहे. फळे पिकविण्यासाठी शासनाने विक्रेत्यांना एथिलीन गॅस चेंबर, एथिलीन गॅस, इथेलॉन, इथेनॉल सॅशेट, एथिलीन जनरेटर याचा वापर करण्याची मूथा दिली आहे. मात्र काही व्यापाऱ्यांकडूनच या पद्धतीचा वापर केला जात असल्याचे समोर येत आहे. 

गंभीर आजार होण्याचे प्रमाण अधिक 
केमिकलचा वापर करून पिकविलेले आंबे खाल्ल्यानंतर अर्धांगवायू, हृदयविकार, मधुमेह, शुगर यासह अनेक आजाराची होण्याची दाट शक्‍यता असते. त्यामुळे नागरिकांनी केमिकलने पिकविलेली केळी खाताना काळजी घेण्याचा सल्ला डॉक्‍टरांकडून दिला जात असतो. 
 
फळे पिकविण्यासाठी कार्बाइडसह ऍसिटिलीन गॅसचा वापर करताना आढळल्यास त्याच्यावर अन्नऔषध प्रशासनातर्फे कठोर कारवाई केली जाणार आहे. यंदा देखील आंबे विक्रेत्यांवर लक्ष राहणार आहे. चुकीच्या पद्धतीने जो व्यापारी आंबे पिकवितांना आढळल्यास त्याची गय केली जाणार नाही. 
-विकास पाटील अन्न सुरक्षा अधिकारी, जळगाव 

Web Title: marathi news jalgaon mango karbaid use