जळगावात तरुणाच्या खिशात मोबाईलचा स्फोट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

बॅटरीच्या स्फोटात खान यांच्या पायाची मांडी भाजली गेली असून, त्यांना घरातील सदस्यांनी लागलीच उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, उपचार सुरू आहेत. परंतू, मोबाईल बॅटरीचा स्फोट नेमक्‍या कोणत्या कारणाने झाला हे समजू शकलेले नाही. 

जळगाव : खिशात ठेवलेल्या मोबाईलच्या बॅटरीचा अचानक स्फोट झाल्याने शहरातील एक इसम जखमी झाला. ही घटना रविवारी सकाळी घडली असून, त्यास उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार सुरू आहेत.

बाहेर जाण्यासाठी घरातून निघताना जळगावातील शनिपेठ परिसरामधील रहिवासी विकार खान शमीउल्ला खान (वय 42) यांनी आपला मोबाईल पॅंटच्या खिशात ठेवला. विकार खानने रात्री मोबाईल बंद करून ठेवला होता. सकाळी बाहेर जात असताना त्यांनी मोबाईल सुरू करून पॅंटच्या खिशात ठेवला. घराच्या पायऱ्या उतरत असताना खिशात ठेवलेल्या मोबाईल बॅटरीचा अचानक स्फोट झाल्याने सारे भयभीत झाले.

बॅटरीच्या स्फोटात खान यांच्या पायाची मांडी भाजली गेली असून, त्यांना घरातील सदस्यांनी लागलीच उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, उपचार सुरू आहेत. परंतू, मोबाईल बॅटरीचा स्फोट नेमक्‍या कोणत्या कारणाने झाला हे समजू शकलेले नाही. 

Web Title: marathi news jalgaon mobile battery blast

टॅग्स