
जळगाव : "थर्टी फर्स्ट' साजरा करणाऱ्या तळीरामांना शासनाने मनसोक्त पिण्यासाठी पहाटे पाचपर्यंत सुविधा उपलब्ध केली आहे. एक दिवसासाठी पिण्याचा वैयक्तिक व क्लबसाठी आता ऑनलाइन परवाना तसेच शासनमान्य दुकानावरही तो उपलब्ध करण्यात आला आहे.
सरते वर्षे 2019 ला निरोप देण्यासाठी अवघे चार दिवस उरले आहेत. "थर्टी फर्स्ट' साजरा करण्यासाठी अनेकांनी तयारीही सुरू केली आहे. तर हॉटेल व्यावसायिक, ढाबे चालकांनी आर्केस्टासह तयारी सुरू केली आहे. शासनानेही त्यांच्या आनंदात कोणाताही व्यत्यय न येऊ देण्यासाठी अधिक वेळ उपलब्ध करून दिली आहे. शिवाय पिण्यासाठी एका दिवसाचा परवाना देण्याची सुविधा दिलेली आहे. दारूबंदी विभागाने यासाठी संपूर्ण तयारी केली असल्याचे सागंण्यात आले आहे.
नक्की पहा > त्याला पाहताच कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला...
"थर्टी फर्स्ट'साठी ऑनलाइन तसेच थेट दुकानावरही परवाने उपलब्ध करण्यात आले आहेत. शासनमान्य विदेशी वाइन शॉपवर पाच रुपयाचा तर देशी दारूच्या दुकांनावर दोन रुपयांत एकदिवसाचा परवाना उपलब्ध होणार आहे. या शिवाय WWW.EXICISE.MAHAONLINE.GOV.IN या वेबसाइटवर एक दिवसाचा ऑनलाइन परवाना मिळण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या शिवाय क्लब पार्टीसाठी शंभर जणांसाठी सात हजार रुपयांचा परवाना देण्यात येत आहे. त्याच्या वर संख्या वाढल्यास त्या प्रमाणात अधिक रक्कम भरून परवाना घ्यावा लागणार आहे. ही सुद्धा सुविधा ऑनलाईनवर उपलब्ध आहे.
पहाटेपर्यंत रंगणार पार्टी
तळीरामासाठी 31 डिसेंबरला रात्री उशिरापर्यंत दुकाने उघडे ठेवण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिलेली आहे. वाइन शॉप व देशी दारू विक्रीची दुकाने रात्री 1 वाजेपर्यंत उघडी असतील, बियरशॉपीनाही रात्री एक वाजेपर्यंत उघडे ठेवण्याची सवलत देण्यात आली आहे. तर परमीट रूमचा परवाना असलेली हॉटेल पहाटे पाच वाजेपर्यंत उघडी राहणार आहेत.
बाटली हलवा "ड्युप्लिकेट' ओळखा
नकली दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. अशी दारू ओळखण्याबाबत उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रारंभिक माहिती देताना सांगितले, की बाटली हलविल्यानंतर जर त्यात क्लिअरनेस आढळला तर ती ओरिजनल आणि जर त्याच फंगस किंवा कचरा आढळला तर ती "डुप्लिकेट' असल्याचे परिमाण आहे. मात्र, ग्राहकांनी शासनमान्य दुकानातूनच दारू खरेदी करावी असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.