उमविचा कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नामविस्तार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असे नामकरण करण्यासंबंधी शिफारस करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. गेल्या महिन्यात झालेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी उमविस बहिणाबाई चौधरींचे नाव देण्याबाबत घोषणा केली होती, त्या घोषणेनंतर या प्रक्रियेतील पुढचा टप्पा आज पार पडला. 

माजीमंत्री तथा ज्येष्ठ भाजपनेते एकनाथ खडसे यांनी उमविस बहिणाबाई चौधरींचे नाव देण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. विधिमंडळ अधिवेशनात घोषणा झाल्यानंतर खानदेशवासीयांनी या घोषणेचे उस्फूर्त स्वागत केले. याबाबत दोन आठवड्यांपूर्वीच खडसेंनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्र पाठवून नामकरणाच्या पुढील प्रक्रियेसाठी विनंती केली होती. त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

ऑगस्टमध्ये नामविस्तार सोहळा 
दरम्यान, ऑगस्ट महिन्यात 24 तारखेला बहिणाबाई चौधरींची जयंती आहे, या दिनाचे औचित्य साधून उमविचा नामविस्तार सोहळा ऑगस्टमध्ये होणार आहे. शक्‍यतो 11 ऑगस्टला हा सोहळा होईल, असे ठरविण्यात आले असून या कार्यक्रमास कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आदी उपस्थित राहतील.

Web Title: marathi news jalgaon nmu bahinabai univercity