esakal | जिल्ह्यात "नॉन रेडझोन'मध्ये ही दुकाने सुरू राहणार 
sakal

बोलून बातमी शोधा

dhakne

जळगाव रेडझोनमध्ये आहे. जळगाव "महापालिका' क्षेत्र हे "रेड झोन'मध्ये आहे. यामुळे जळगाव महापालिका क्षेत्र, जिल्ह्यातील "प्रतिबंधित क्षेत्र' वगळता इतर ठिकाणी अत्यावश्‍यक सेवेसह इतरही दुकाने सुरू करता येणार आहे. तर मॉल, सलून, रेस्टॉरंट, हॉटेल्स, स्पा सेंटर, रेस्टॉरंट, नाश्‍त्याचा गाड्या, ब्युटी पार्लर, बंद राहणार आहेत. 

जिल्ह्यात "नॉन रेडझोन'मध्ये ही दुकाने सुरू राहणार 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्यात शासनाने 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. आता राज्यात "रेडझोन' व 'नॉन रेडझोन' हे दोनच झोन राहतील. नॉन रेडझोनमधील दुकाने सुरू करण्याबाबतचे आदेश राज्याने दिले आहे. जळगाव जिल्ह्यातही 'नॉन रेडझोन' मधील दुकाने सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी काढले आहे. 
जळगाव रेडझोनमध्ये आहे. जळगाव "महापालिका' क्षेत्र हे "रेड झोन'मध्ये आहे. यामुळे जळगाव महापालिका क्षेत्र, जिल्ह्यातील "प्रतिबंधित क्षेत्र' वगळता इतर ठिकाणी अत्यावश्‍यक सेवेसह इतरही दुकाने सुरू करता येणार आहे. तर मॉल, सलून, रेस्टॉरंट, हॉटेल्स, स्पा सेंटर, रेस्टॉरंट, नाश्‍त्याचा गाड्या, ब्युटी पार्लर, बंद राहणार आहेत. 

जिल्ह्यातील हॉटेल्स, स्पा सेंटर, रेस्टॉरंट, नाश्‍त्याचा गाड्या, ब्युटी पार्लर, मॉल, सलून, चित्रपटगृह बंद राहणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्र वगळता जिल्ह्यात दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र सोशल डिस्टन्सचे नियमांचे पालन ग्राहक व दुकानदारांना करावे लागणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करणे, ग्राहक आणि दुकानदार यांनी मास्क वापरणे, दुकानाच्या बाहेर ग्राहकांसाठी सॅनिटायझर उपलब्ध करून देणे, दिलेल्या वेळेतच दुकाने सुरू ठेवणे अशाप्रकारे नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन डॉ.ढाकणे यांनी केले आहे. 

रेडझोनमध्ये प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी ऑनलाइन मद्यविक्रीस परवानगी देण्यात आली आहे.जिल्ह्यातही प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर ठिकाणी मद्य विक्रीच्या दुकानांमधील साठा संपविण्यापर्यंत मद्य विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यांना नवीन साठा मागविता येणार नाही. 

स्वच्छतेस परवानगी 
जिल्ह्यातील चित्रपट गृहे बंद ठेवण्याचे आदेश असले तरी 31 मेनंतर ते सुरू होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या साफसफाईसाठी चित्रपटगृह उघडून सफाई करता येईल. सुरू करण्याचे आदेश आले तरच ते सुरू करता येतील. 

नॉन रेडझोनमध्ये हे सुरू असणार 
- किराणा, मेडिकल दुकाने 
- रुग्णवाहिका, शववाहिनी 
- पेट्रोल, डिझेल 
- धान्य दुकानातून वितरण 
- लिकर, वाइन शॉप 
- खासगी दवाखाने 
- जीवनावश्‍यक मालवाहतूक 
- उद्योग 
- बियाणे, खते विक्री 
- फळ, भाजीपाला दूध 
- मॉल, हॉटेल, सलून वगळून इतर दुकाने 

हे बंद राहणार 
- रेल्वे, विमान 
- जिल्ह्याच्या सीमा 
- हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ 
- पाणीपुरी भेलपुरीची दुकाने 
- शाळा, महाविद्यालये 
- सलून, ब्युटी पार्लर, स्पा 
- मॉल्स, सिनेमा थिएटर 
 

loading image