संचारबंदी झुगारणाऱ्यांना लाठ्यांचा प्रसाद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येक पोलिस ठाण्याच्या पथकातर्फे गावबंद करण्यात आले. फळ-भाजी विक्रेते, दूध मेडिकल आणि अत्यावश्‍यक सेवेत मोडणाऱ्या सेवा वगळता पूर्णतः बंद पाळण्यात आला. 

जळगाव  : पंतप्रधान मोदी यांनी "लॉकडाउन'ची घोषणा केल्याने रात्रीच नागरिकांनी किराणा दुकानांवर गर्दी केली होती. अनावश्‍यक गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी वारंवार आवाहन करूनही नागरिक ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने पोलिसांना अखेर बळाचा वापर करावा लागला. बुधवार सकाळपासूनच जिल्ह्यातील सर्व 35 पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येक पोलिस ठाण्याच्या पथकातर्फे गावबंद करण्यात आले. फळ-भाजी विक्रेते, दूध मेडिकल आणि अत्यावश्‍यक सेवेत मोडणाऱ्या सेवा वगळता पूर्णतः बंद पाळण्यात आला. 

पहिल्यांदा चौक बंद 
शहरातील प्रमुख चौकांना पोलिसांनी बॅरिकेट्‌स लावले होते. प्रत्येक चौकात वाहनधारकाची चौकशी करूनच त्याला पुढे जाऊ दिले जात होते. ठोस कारण नसणाऱ्यांना लाठीचा प्रसादही खावा लागला. पोलिसांनी रस्त्यावरील गर्दी थांबवण्यासाठी घोषणा देऊन, हात जोडून विनंती करूनही पाहिले मात्र उपयोग होत नसल्याने पोलिसांचा नाइलाज झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

चढ्याभावाने भाजी विक्री 
संचारबंदी काळात ठरावीक ठिकाणीच भाजी विकणारे आढळून आले. प्रत्येक भाजीसाठी किलो मागे दहा ते पंधरा रुपये जादा आकारणी करून विक्री होत आहे. ठोक बाजारातूनच माल चोरून लपून आणावा लागत असल्याची कारणे देत विक्रेत्यांकडून सर्रास लूट केली जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Offerings of sticks for those who want to block communication

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: