जळगाव जिल्ह्यातील पेट्रोल पंप 18 तास बंद राहणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

जळगाव जिल्ह्यातील महापालिका, सर्व पालिका, नगरपंचायत या शहराच्या तीन किलोमीटर परिसरात सर्व दुचाकी वाहने/चारचाकी वाहने, हलके, मध्यम व जड वाहतुकीची वाहने (ऑटो रिक्षा वगळून) व अनावश्‍यक रित्या फिरणारी इतर वाहनांना रस्त्यावरून ये-जा करण्यास बंदी करण्यात आली आहे. 

जळगाव : जिल्ह्यात कोरोनो'चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आजपासून अत्यावश्‍यक सेवेतील वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांना रस्त्यावरून फिरविण्यास बंदी केली आहे. सोबतच जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप 18 तास बंद करण्याचे आदेशही दिले आहेत. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज काढले आहेत. 

जळगाव जिल्ह्यातील महापालिका, सर्व पालिका, नगरपंचायत या शहराच्या तीन किलोमीटर परिसरात सर्व दुचाकी वाहने/चारचाकी वाहने, हलके, मध्यम व जड वाहतुकीची वाहने (ऑटो रिक्षा वगळून) व अनावश्‍यक रित्या फिरणारी इतर वाहनांना रस्त्यावरून ये-जा करण्यास बंदी करण्यात आली आहे. 

सहा तास पेट्रोल पंप सुरू 
महापालिका क्षेत्र, सर्व नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील पेट्रोल पंप सकाळी सात ते दहा व सायंकाळी चार ते सात या वेळेतच सुरू राहतील. इतर वेळी सर्व सामान्यांसाठी पेट्रोलपंप बंद राहतील.त्यावेळेत अत्यावश्‍यक सेवेतील व्यक्तींसाठी पंप सुरू राहतील. त्याबाबत त्यांना मात्र अत्यावश्‍यक सेवेचे ओळखपत्र गरजेचे असेल. हे आदेश आज दुपारी तीन पासून 31 मार्चपर्यंत लागू असतील. ग्रामीण भागातही पेट्रोल पंपासाठी हीच वेळ असेल 

गॅरेज अत्यावश्‍यक सेवांसाठी सुरू 
कोरोनोचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व ऑटो, दुचाकी, चारचाकी वाहनांची दुरुस्ती करणारे गॅरेजेस बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र अत्यावश्‍यक व जीवनावश्‍यक वस्तू, सेवा, मनुष्यबळ पुरविणाऱ्या सर्व संबंधित यंत्रणा वापरत असलेल्या वाहनांची आवश्‍यक तेव्हा दुरुस्ती व उपाय योजना करण्यासाठी गॅरेज मालक व चालक यांना बंधनकारक असेल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Petrol pumps in the district will remain closed for 18 hours