दारू पिवून आले माफी मागायला आणि घरातच पत्नीवर केला चाकूचा वार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

सकाळी आठ वाजताच रमेश सुर्यंवशी घरी आले व कुटूंबीयांची माफी मागू लागल्याने मुलांनीही त्यांना घरात घेतले, चहा नाष्टा दिल्यानंतर मुलगा मनोज व महेंद्र असे दोघेही कामावर निघुन गेल्यावर त्यांनी वाद घालून पत्नी सुरेखाच्या पोटाता चाकूने वार करुन जखमी केले.

जळगाव : जिल्हा पोलिस दलात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्याच्या दारुड्या पित्याने आज सकाळी अकरा वाजता पत्नीच्या पोटात व हातावर चाकू मारुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली. सुरेखा रमेश सुर्यवंशी(वय-55) असे जखमी महिलेचे नाव असून हल्लेखोर स्वत:हुन पोलिस ठाण्यात हजर झाल्याने त्यास अटक करण्यात आली आहे. 
पोलिस मुख्यालयात कार्यरत महेंद्र रमेश सुर्यवंशी कार्यरत असून शाहुनगर येथील सेक्‍टर-3 रुमनं.8 मध्ये आई सुरेखा, वडील रमेश, भाऊ मनोज वहिनी भाग्यश्री अशासह वास्तव्यास आहेत.गेल्या आठ दिवसांपुर्वी वडील रमेश सुर्यंवशी यांनी दारुच्या नशेत कुटूंबात वाद घातला होता. नेहमी नेहमी पत्नीला मारहाण आणि कुटूंबीयांत गोंधळ घातल्याने त्यांना मुलांनी राहण्यास नाही सांगतले. परिणामी त्यांनी इंद्रप्रस्थनगरात स्वतंत्र खोली केली असुन गेल्या आठ दहा दिवसांपासुन तेथेच वास्तव्यास होते. आज सकाळी आठ वाजताच रमेश सुर्यंवशी घरी आले व कुटूंबीयांची माफी मागू लागल्याने मुलांनीही त्यांना घरात घेतले, चहा नाष्टा दिल्यानंतर मुलगा मनोज व महेंद्र असे दोघेही कामावर निघुन गेल्यावर त्यांनी वाद घालून पत्नी सुरेखाच्या पोटाता चाकूने वार करुन जखमी केले. घटनेची माहिती कळताच जिल्हापेठ पोलिस घटनास्थळी दाखल झाले.जखमी सुरेखा सुर्यवंशी यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर. हल्लेखोर रमेश सुर्यवंशी स्वत:हुन पोलिसांत हजर झाले. मुलगा मनोज याने दिलेल्या तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलिसांत प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

दारु पिऊनच आले माफी मागायला 
यावेळी त्यांनी मद्यप्राशन केले होते. त्यांनी मुलगा मनोज यास माझे चुकले असून मला माफ करा, असे सांगितले. वडीलांना मुलगा मनोज हा घरात घेवून गेला. त्यांनाही घरातील इतरांनीही समजूत घातली. यानंतर रमेश यांनी सर्वांची माफी मागितली. यानंतर महेंद्र व मनोज हे दोन्ही कामावर निघून गेल्यावर त्यांनी पत्नी सुरेखावर चाकुने हल्ला चढवत गंभीर जखमी केले. जखमी सुरेखा सुर्यवंशी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon police colony husband attack wife enjured