माहेरून पंधरा लाख आण..नाहीतर विचार कर...पोलिसाची पत्नीला धमकी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 मार्च 2020

ऑफिसमध्ये त्रास होत असल्याने पती किशोर हे योगीता यांना तु माझ्यासाठी काही पण कर मला त्रास झाला पाहिजे असे सांगायचे व एैकले नाही तर मारहाण शिवीगाळ करायचे. यानंतरही 22 जुलै 2019 रोजी पार्किंगमध्ये असलेली गाडी काढण्यासाठी घरमालकाला सांगिल्याचा राग आल्याने पती किशोर वानखेडे यांनी लाथा बुक्‍क्‍यांनी मारहाण केली होती.

जळगाव : चांगल्या पोलीस ठाण्यात बदली व्हावी, यासाठी बदलीसाठी लागणारे 15 लाख रुपये माहेरुन आणावे यासह इतर कारणांकरुन पत्नीचा शारिरीक तसेच मानसिक छळ करणाऱ्या तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पोलीस अधिकारी पतीविरुध्द त्याच्या पत्नीला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी वेळ आली आहे. या तक्रारीवरुन रविवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आकोला जिल्हा पोलीस आस्थापनेवर डाबकी येथील पोलीस स्टेशन कार्यरत सहाय्यक पोलीस निरिक्षक किशोर वानखेडे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

विविध कारणांवरुन शारिरीक, मानसिक छळ 
नाशिक येथील सिडको चाणक्‍य नगरात रहिवासी योगीात यांचे 2011 मध्ये अमळनेर येथील किशोर वानखेडे यांच्यासोबत लग्न झाले. लग्नाच्या वेळी योगीता हिच्या कुटुंबियांनी 8 लाख 25 हजार रुपये हुडा व लग्न असा एकूण 15 लाख रुपयांचा खर्च केला. लग्नानंतर पतीची पहिली नेमणूक पुणे येथे झाली. यानंतर नाशिक, बुलढाणा याठिकाणी त्यांची बदली. यादरम्यानच्या काळात योगीता यांना एक मुलगी व मुलगा झाला. मुलगी एंजल ही सात वर्ष व मुलगा प्रिन्स 3 वर्षाचा आहे. योगीता गरोदर असतांना त्याच्यावर त्यां भाऊ रहात होता. यावेळी किशोर वानखेडे यांनी त्यालाही शिवीगाळ करुन हाकलून दिले होते. व योगीता यांना मारहाण केली होती. 

22 तोळ्याचे दागिणेही पोलीस पतीने ठेवून घेतले 
ऑफिसमध्ये त्रास होत असल्याने पती किशोर हे योगीता यांना तु माझ्यासाठी काही पण कर मला त्रास झाला पाहिजे असे सांगायचे व एैकले नाही तर मारहाण शिवीगाळ करायचे. यानंतरही 22 जुलै 2019 रोजी पार्किंगमध्ये असलेली गाडी काढण्यासाठी घरमालकाला सांगिल्याचा राग आल्याने पती किशोर वानखेडे यांनी लाथा बुक्‍क्‍यांनी मारहाण केली होती. यानंतर बदलीसाठी माहेरुन 15 लाख रुपये घेवून असे सांगत मारहाण व शिवीगाळ करायचे. या त्रासाला कंटाळून योगीता ह्या त्यांची आजी व दोन्ही मुलांसह जळगावात विभक्त राहत आहेत. वेगळे निघाल्यावर पतीने योगीता हिचे 22 तोळे सोन्याचे दागिणेही काढून घेतले. व तुला सोने देणार नाही, तुला जे करायचे ते कर अशी धमकी दिली होती. अशाप्रकारे या मानसिक तसेच शारिरीक त्रासाला कंटाळून 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon police officer wife case torture cash