पोलिसांचे पुण्य कर्मात "कॉन्ट्रीब्युशन'... चिमुरड्यांची तहानभुक शमवुन घालवला थकवा ! 

पोलिसांचे पुण्य कर्मात "कॉन्ट्रीब्युशन'... चिमुरड्यांची तहानभुक शमवुन घालवला थकवा ! 

जळगाव: कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर संपुर्णदेश लॉक डाऊन आहे, मोठमोठी उद्योग बंद पडले असून हातावर पोट असणाऱ्या कामगार,मजुरांवर उपास मारीची वेळ आली आहे. शहराला लागून असलेल्या झोपडपट्टी, वाडे वस्त्यांवर परिस्थीती याहुन बिकट आहे. हाताला काम नाही, पोटात अन्न नाही आणि कुणी भिकही देणार नाही अशी वाईट अवस्था गेल्या पंधरा दिवसात उदभवली आहे. असे असतांना जिल्हापोलिसदलातील तरुण पोलिस मित्रांनी कॉन्ट्रीब्युशन करुन गोरगरीबांच्या लहानग्यांना पोटभर पोषक अन्न मिळवण्यासाठी धडपड चालवली आहे. 

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावमुळे सर्वाधीक फटका गोरगरीबांना सहन करावा लागत आहे. गेल्या महिन्या (ता.20) पासून कामधंदे पुर्णत:बंद असून हातावर पोट असणाऱ्या गोरगरीबांवर उपासमारीची वेळ आली आहे. नोकरदारांनाही पगारकपातीचे संकेत शासनाने दिले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासुन लागू असलेल्या लॉकडाऊन मुळे शेवटचे दिवस आता जिकरीचे जात आहेत. शहरात अनेक सामाजीक संस्था अन्न धान्य किंवा किराणा वाटप करीत आहेत. काहींनी जेवणाचे पार्सल वाटपला सुरवात केली आहे. हे सर्व माणुसकीधर्म पाळत असतांना पोलिस का मागे राहवा.जिल्हा पोलिसदलातील सोशलमिडीया विभागात कार्यरत चार तरुण पोलिस मित्रांना सहज बोलता बोलता आपणही काहीतरी केले पाहिजे या उद्देशाने स्वत:च्या पगारातून कॉन्ट्रीब्युशन करुन गोरगरीब मुलांसाठी जेवणाची कल्पना सुचली. वसीम मलीक, प्रिती नन्नवरे, प्रमोद वाडिले, भरत बेलदार यांनी कोणाचीही मदत न घेता आणि कोणालाही न सांगता थेट शंभर मुलांची पंगत जेऊ घालत आहे. दोन ते दहा वर्षाच्या मुलांचे पोषण होईल असे स्वादिष्ट व्यंजन अँजल फुड कडून तयार करुन घेत वाडे-वस्त्यांवर नेऊन स्वत:च्या हाताने हे चौघे मित्र या मुलांना जेऊ घालत आहे. पंगतीत बसल्यावर प्रीती ताई सर्व मुलांनचे हात सॅनेटाझरने स्वच्छ करते, नंतरच प्रत्येकाच्या हातात ताट देवून जेवण वाढले जाते. 

पुण्याचे कॉन्ट्रीब्युशन 
महाविद्यालयीन तरुण, नुकतीच नोकरी लागलेले समवयस्क तरुण-तरुणींचे कॉन्ट्रीब्युशन हे नेहमीच पार्ट्या मौज-मजा आणि दंगा-मस्तीसाठी असते. मात्र, हे चौघं पोलिस मित्र आपत्कालीन परिस्थीतीत काटेकोरपणे ड्युट्या करुन स्वत:थकलेले असतांना अगोदर या चिमुरड्यांच्या पोटात दोन घास कसे जातील यासाठी प्रयत्न करतात, जेवणावळीची पंगत संपल्यावरच हे चौघे मित्रही जेवतात. चिमुरड्यांच्या निरागस चेहऱ्यावरील हास्य हेच बक्षीस मानणाऱ्या आणि खाकीची आण घेतलेल्या या चौघांचे पुण्य इतर नोकदारांसाठी आदर्श ठरु पाहत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com