पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराघरांत साजरी; प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात खंड 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

अहिल्यादेवी होळकर यांची दरवर्षी शहरातून मोटारसायकल रॅली काढून समाजप्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यंदा कोरोनाच्या संकटामुळे या सर्व गोष्टींना फाटा देत समाज बांधवांनी घराघरांत अहिल्यादेवीच्या प्रतिमेचे पूजन करत सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्यात आले.

जळगाव : कोरोनाच्या संकटकाळात लॉकडाउनचे तंतोतंत पालन करत शहरासह जिल्ह्यातील घराघरांत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची 295 वी जयंती समाजबांधवांकडून साजरी करण्यात आली. 

जळगाव जिल्हा धनगर समाज महासंघ प्रणीत मल्हासेना, कर्मचारी संघटना, अहिल्या महिला संघाच्यावतीने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम मोजक्‍या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत धनगर समाज बोर्डिंगमध्ये साजरा करण्यात आला. 
यावेळी धनगर समाज बोर्डिंगचे अध्यक्ष नानाभाऊ उखा बोरसे यांच्या हस्ते पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. 
याप्रसंगी धनगर बोर्डिंगचे अध्यक्ष नानाभाऊ बोरसे, सचिव प्रभाकर न्हाळदे, संचालक संतोष धनगर, प्रदेश उपाध्यक्ष संदीप तेले, उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख सुभाष करे, धनगर समाज कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप धनगर, जिल्हा सरचिटणीस गणेश बागूल, महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष विष्णूआप्पा ठाकरे, शहराध्यक्ष प्रवीण पवार, संदीप पाचपोळ, मयूर ठाकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

घराघरांत प्रतिमा पूजन 
अहिल्यादेवी होळकर यांची दरवर्षी शहरातून मोटारसायकल रॅली काढून समाजप्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यंदा कोरोनाच्या संकटामुळे या सर्व गोष्टींना फाटा देत समाज बांधवांनी घराघरांत अहिल्यादेवीच्या प्रतिमेचे पूजन करत सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्यात आले. 
 
ऑनलाइन युवा सदस्य नोंदणी अभियान 
महाराष्ट्र धनगर समाज महासंघ प्रणीत जळगाव जिल्हा मल्हार सेना सदस्य युवा नोंदणी अभियान ऑनलाइन लिंक भरून संस्थेचे अध्यक्ष नानाभाऊ बोरसे, संतोष धनगर यांच्या हस्ते सुरू करण्यात आले. मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष (जळगाव लोकसभा) संदीप मनोरे यांनी ही ऑनलाइन लिंक तयार केली आहे. धनगर समाजातील 18 वर्ष वरील व 45 वर्षा आतील युवकांनी सदस्य नोंदणी करावी असे आवाहन धनगर समाज महासंघाचे प्रदेश महामंत्री सुभाष सोनवणे, मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजय पाटील (रावेर लोकसभा), मल्हार सेनेचे जिल्हा सरचिटणीस महेंद्र सोनवणे यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Punyashrlok Ahilya Devi Holkar's birthday celebrated in every house; Volume at the first public event