esakal | फुकट्यांकडून तीन लाखांचा दंड वसूल ! 

बोलून बातमी शोधा

railway cheaking
फुकट्यांकडून तीन लाखांचा दंड वसूल ! 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : म्हसावद रेल्वे स्थानकावर आज अचानक सर्वच गाड्या थांबवून तिकीट तपासणी करण्यात आली. यावेळी फुकट प्रवास करणाऱ्यांकडून तीन लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दंड न भरणाऱ्यांवर केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वच गाड्यांना अर्धा तासाचा ब्रेक देण्यात आला होता. 

वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक आर. के. शर्मा, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक अजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आज अचानक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. म्हसावद रेल्वे स्थानकावर तिकीट तपासणीसाठी 40 जणांचे पथक तयार करण्यात आले होते. सोबतच आरपीएफचे सुरक्षा पथकही होते. 487 प्रवासी अनियमित श्रेणीचे तिकीट घेऊन प्रवास करताना सापडले. त्यांच्याकडून 2 लाख 51 लाख 375 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. 131 प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळले त्यांच्याकडून 73 हजार 395 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. असा एकूण तीन लाख 24 हजार 770 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ज्यांनी सामानाची बुकिंग न करता प्रवास केला त्यांच्याकडूनही दंड वसूल करण्यात आला. 
पथकात मुख्य तिकीट निरीक्षक वाय. डी. पाठक, एटीएस स्क्वाड, प्रोसिक्‍यूशन स्क्वॉड, आसीपी चेक्‍स, सजग स्क्वॉड, रेल्वे कर्मचारी स्टाफ यांनी ही कारवाई केली. प्रवाशांनी योग्य ते तिकीट घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

या गाड्यांमध्ये झाली तपासणी.. 
- अप गाड्या ः झेलम एक्‍स्प्रेस, भुवनेश्‍वर एक्‍स्प्रेस, महानगरी एक्‍स्प्रेस, सचखंड एक्‍स्प्रेस, मुंबई पॅसेंजर, गोवा एक्‍स्प्रेस, पाटीलपुत्र एक्‍स्प्रेस, गोदान एक्‍स्प्रेस, पनवेल एक्‍स्प्रेस, काशी एक्‍स्प्रेस, गुवाहाटी एक्‍स्प्रेस, पुष्पक एक्‍स्प्रेस. 
- डाउन गाड्या : महानगरी एक्‍स्प्रेस, वाराणसी सुपर एक्‍स्प्रेस, महाराष्ट्र एक्‍स्प्रेस, देवळाली शटल, रत्नागिरी एक्‍स्प्रेस, गोवा एक्‍स्प्रेस, गीतांजली एक्‍स्प्रेस, काशी एक्‍स्प्रेस.