"राष्ट्रवादी कॉंग्रेस'तर्फे तालुकानिहाय दुष्काळ परिषद : ऍड. रवींद्र पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

जळगाव : जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती भयानक होत आहे. मात्र शासन अद्यापही उपाययोजना करण्यात दिरंगाई करीत आहे. शासनाला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे लवकरच तालुकानिहाय दुष्काळी परिषद घेण्यात येईल अशी घोषणा जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. 

जळगाव : जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती भयानक होत आहे. मात्र शासन अद्यापही उपाययोजना करण्यात दिरंगाई करीत आहे. शासनाला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे लवकरच तालुकानिहाय दुष्काळी परिषद घेण्यात येईल अशी घोषणा जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. 
आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महानगराध्यक्ष नामदेव चौधरी, महिला आघाडीच्या अध्यक्षा कल्पना पाटील, सविता बोरसे, परेश कोल्हे, सलीम इनामदार, आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना ऍड. पाटील म्हणाले, की जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. पालकमंत्र्यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. जिल्ह्यात अधिकाऱ्यांच्या तालुकास्तरावर बैठका घेऊन उपाययोजना कराव्यात. या शिवाय मागेल त्याला टॅंकर उपलब्ध करून दिले पाहिजे. त्यासाठी जनावरांना पिण्यासाठी वेगळे व माणसांना पिण्यासाठी वेगळे टॅंकर दिले पाहिजे. या शिवाय सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले पाहिजे, या शिवाय वीज बिलही तातडीने माफ करावे. शासनाने पंधरा दिवसात त्याबाबत निर्णय घ्यावा. या शिवाय जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात. दुष्काळी परिस्थितीवर शासनाला जागे करण्यासाठी पक्षातर्फे प्रत्येक तालुक्‍यात दुष्काळी परिषद घेण्यात येईल, यावेळी पक्षाचे निरीक्षक दिलीप वळसे पाटील तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहतील. तसेच जिल्ह्याचे माजी आमदार, माजी खासदार व पदाधिकारीही या बैठकांना उपस्थित राहतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon rashtrwadi dushkal parishad