"रेडक्रॉस'ने वाचविले वर्षभरात 22 हजार रुग्णांचे प्राण 

"रेडक्रॉस'ने वाचविले वर्षभरात 22 हजार रुग्णांचे प्राण 

जळगाव : जगात कोणते सर्वश्रेष्ठ दान असेल तर ते रक्तदान होय. रक्तदान केल्याने एखाद्याचे प्राण वाचविल्याचा आत्मिक आनंद मिळतो. येथील रेडक्रॉस सोसायटीने रक्तदात्यांकडून रक्त संकलन करून वर्षभरात तब्बल 22 हजार 425 गरजू रुग्णांना देऊन त्यांचे प्राण वाचविले आहेत. कन्यादान, देहदानापेक्षाही रक्तदान सर्वश्रेष्ठ असल्याने रक्तदान सर्वांनी करायची गरज आहे. 

सुरक्षित रक्तपुरवठा 
नॅट (NAT) म्हणजे (न्यूक्‍लिक ऍसिड टेस्ट) सर्वाधिक सुरक्षित रक्तपुरवठा करण्यासाठी जागतिक दर्जाचे प्रभावी तंत्रज्ञान. रक्त व रक्त घटक रक्तपेढीतून रुग्णाला देताना एच.आय.व्ही, हिपॅटायटीस-बी, हिपॅटायटीस-सी, गुप्तरोग, मलेरिया आदींचे रोगजंतू त्यात नसल्याची खात्री केली जाते. प्रचलित Elisa तंत्रानुसार या रोगजंतूंसाठी चाचण्या रोगांच्या प्रतिजैविकांचे (Anti bodies) अस्तित्वानुसार आधारित असतात व त्यानुसार "विंडो पिरीयड' हा कालावधी महत्त्वाचा असतो. हा कालावधी जेवढा कमी तेवढी दिल्या जाणाऱ्या रक्तातून संसर्गाची शक्‍यता कमी असते. NAT या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रतिजैविकाऐवजी रक्तातील रोगजंतूंची संक्रमित जनुके (DNA-RNA) शोधून काढली जातात व संसर्गाच्या अगदी सुरवातीच्या काळातील ही जंतूंचे अस्तित्व अचूकपणे शोधता येते व विंडो पिरीएड कालावधी कमी होतो. त्यामुळे रक्ताची सुरक्षितता अधिक लवकर समजून येते. रक्त अधिक सुरक्षित बनते. 

मशिनद्वारे "नॅट टेस्टिंग' 
खानदेशात इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव संचलित रक्तपेढीत Fully Automated मशिनद्वारे नॅट टेस्टिंगची सुविधा उपलब्ध झाली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली 1 जानेवारी 2019 रोजी नॅट तंत्रज्ञान रेडक्रॉस रक्तपेढीत कार्यान्वित झाले. 


आतापर्यंत केलेल्या नॅट तंत्रज्ञान तपासणी दरम्यान पाच रक्तदात्यांची तपासणी पॉझिटिव्ह आली. म्हणजेच रक्तघटकानुसार पाहिल्यास 20 रुग्णच नाही तर त्यांचे परिवारही आपण सुरक्षित करू शकलो, याचे समाधान आहे. तीस टक्‍के "नॅट' रक्त व रक्तघटकाचे वितरण केले आहे. हे प्रमाण शंभर टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचविणे नैतिक कर्तव्य आहे. या तंत्रज्ञानाची माहिती संपूर्ण जिल्ह्यात पोहोचविण्याचे कार्य सुरू आहे. 
- डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, चेअरमन, रक्तपेढी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com