esakal | जळगावची रेड झोनमध्ये एन्ट्री; चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

corona positive

दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यात अमळनेर येथील एक 17 वर्षीय युवकासह 44 वर्षीच्या पुरुषाचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 18 वर पोहचली असून जळगावकरांसाठी ही मोठी चिंतेची बाब बनलेली आहे. अमळनेरचे तीन आणि भुसावळमधील एका जणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे

जळगावची रेड झोनमध्ये एन्ट्री; चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यात कालपर्यंत कोरोनाचे 14 रुग्ण आढळून आले होते. आज पुन्हा या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून कोरोनाग्रस्तांचा आकडा 18 वर पोहचला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्याने रेड झोनमध्ये एन्ट्री केली आहे. 
संपूर्ण देशभरात कोरोनाने हाहाकार माजविला असून दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात देखील कोरोनग्रस्तांची संख्या वाढतच असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज दुपारपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 14 इतकी होती मात्र आज दुपारी काही अहवाल प्राप्त झाले असता. त्यांमध्ये दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यात अमळनेर येथील एक 17 वर्षीय युवकासह 44 वर्षीच्या पुरुषाचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 18 वर पोहचली असून जळगावकरांसाठी ही मोठी चिंतेची बाब बनलेली आहे. अमळनेरचे तीन आणि भुसावळमधील एका जणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे

कोरोनाच्या यादीत अमळनेर टॉपवर 
जिल्ह्यातील अमळनेर तालुक्‍यातील कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 10 रुग्ण आढळून आले आहे. आज पुन्हा दोन रुग्णांची वाढ झाली असून हे रुग्ण देखील अमळनेर मधील असून अमळनेर मध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ही 12 वर पोहचली आहे. त्यामुळे कोरोनाच्या यादीत जिल्ह्यातील अमळनेर तालुका टॉपवर आला आहे. 

दोन रुग्ण मयत पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 
अमळनेरमधील शाह आलमनगरातील एका 43 वर्षीय इसमाला कोरोनासदृष्य लक्षणे जाणवत असल्याने त्याला जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती खराब झाल्याने त्याचा ता. 21 एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. शनिवारी या इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, या इसमाच्या संपर्कात आलेल्यांना प्रशासनाकडून क्‍वारंनटाईन करण्यात आले होते. यातील दोन जणांना अहवाल आज प्राप्त झाला असून या दोघांचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. 

जिल्ह्याचा रेड झोनमध्ये प्रवेश 
जिल्ह्यात कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कालपर्यत जिल्हा रेड झोनच्या उंबरठ्‌यावर येवून ठेपला होता. आज यामध्ये दोन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 16 वर येवून पोहचली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्याने रेड झोनमध्ये प्रवेश केला आहे.

loading image
go to top