वेग नियंत्रक यंत्रणा काढून डंपर सुसाट ! 

rto cheaking
rto cheaking

जळगाव : शहरासह जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले असून वाळू डंपर, ट्रकचालक या अपघातांना कारणीभूत असल्याचे आढळून आले. परिणामी उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि शहर वाहतूक शाखेतर्फे स्पेशल ड्राईव्ह राबवण्यात येत आहे. पोलिस निरीक्षकांनी स्वतः 12 वाळू डंपरवर कारवाई करण्यात आली आहे. 
नुकताच यावल तालुक्‍यात क्रूझर आणि राखेच्या डंपरच्या झालेल्या अपघातात 12 जणांना जीव गमवावा लागला. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या आदेशाने जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक विभागातर्फे वाहन तपासणी व कारवाई मोहीम तीव्र करण्यात आली आहे. आज वाहतूक निरीक्षक देविदास कुनगर यांनी बारा वाळू डंपर ताब्यात घेतले आहेत. 

स्पीड गव्हर्नन्स डिसकनेक्‍ट 
अवजड वाहतुकीसाठी वापर होणाऱ्या वाळू डंपरला कंपनीतर्फेच वेगमर्यादेसाठी स्पीड गव्हर्नन्स सिस्टिम लावण्यात आलेली असते. वाहतूक विभागाने ताब्यात घेतलेल्या सर्वच्यासर्व 12 डंपर मध्ये सुसाट वेगात वाहन पळविण्यासाठी स्पीड गव्हर्नन्स यंत्रणा खंडित करण्यात आल्याचे आढळून आले असल्याने वाहतूक विभागाने या सर्व वाहनांना ताब्यात घेऊन उपप्रादेशिक परिवहन विभागाला कारवाई बाबत पत्र दिले आहे. 

ताब्यात घेतलेले डंपर 
(एमएच.18 एम. 8172),(एमएच.19 2322), (एमसीटी-5205), (एमएच.19सी.वाय.701), (एमएच.19झेड.5112), (एमएच.19.झेड.4194),(एमएच.46ई.4260), (एमएच.19झेड.0305)(एमएच.19.झेड.6669), (एमएच.26अेडी.2702),(एमएचं.19झेड.9696), आदी वाहनांचा समावेश असून काहींना स्पीड गव्हनर्स लावण्यात आलेले नाही तर काहींचे काढून टाकण्यात आल्याचे आढळले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com