नाशिकमध्ये 8 जूनपासून "तरुणाईचा कुंभमेळा' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

जळगाव : युवकांना करिअरमध्ये उत्तुंग भरारी घेण्यासाठी प्रेरणा मिळावी, त्यांच्यात सकारात्मक सामाजिक बदलांसाठी पुढे येण्याची जाणीव निर्माण व्हावी, यासह त्यांच्यातील नेतृत्वगुणांच्या विकासासाठी यंदाही "यिन' व्यासपीठातर्फे "समर यूथ समिट' होत आहे. नाशिक येथे 8 जूनपासून होणाऱ्या या तरुणाईच्या कुंभमेळ्याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. 
नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या चार जिल्ह्यांसाठी आयोजित करण्यात आलेले हे "समिट' नाशिकमधील रावसाहेब थोरात सभागृहात 8 व 9 जूनदरम्यान होणार आहे. 

उत्स्फूर्त प्रतिसाद 
सळसळत्या तरुणाईला दिशा दर्शविणारा हा कार्यक्रम आहे. गेल्या चार वर्षांत प्रत्येकवेळी या समिटला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. यंदाही या समिटबद्दल कमालीची उत्सुकता तरुणाईमध्ये असून, त्यासाठी तरुणांनी उत्स्फूर्तपणे नावनोंदणीस सुरवात केली आहे. 
समिटमध्ये महाविद्यालयीन युवकांना करिअरच्या संधी योग्य दिशा तसेच शिक्षण, उद्योग, नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी, स्टार्टअप, टीम बिल्डिंग, करिअर निवड, उद्योजकता, सिनेक्षेत्र, नवतंत्रज्ञान आदी क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या मान्यवरांसोबत तसेच समाजातील अवलिया व्यक्तींशी संवाद साधता येणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांना निवास व्यवस्थेसह भोजन, शिबिर कीट आणि सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. 
 
यंदाची समिट कधी, कुठे.. 

समिटचे ठिकाण : रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड, नाशिक. 
कधी : 8 व 9 जून. 

सहभागासाठी संपर्क : 
अंकुश सोनवणे (9689053211) 
जागृती बोरसे (7767980100) 

"सकाळ-यिन'तर्फे आयोजित यूथ समिटमध्ये सहभागी तरुणांशी संवाद साधण्याची संधी गेल्यावर्षी मिळाली. तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा असून देशाचे भविष्य घडविणाऱ्या या पिढीसाठी अशाप्रकारची समिट निश्‍चितच उपयुक्त ठरले. या उपक्रमातून उद्याचे नेतेही घडणार आहेत. 
- गुलाबराव पाटील, सहकार राज्यमंत्री 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon sakal yin summer yuth sammite nashik