Video कमी पेट्रोलवर चालणारी प्रदूषणमुक्त बाईक 

संधिपाल वानखेडे
Friday, 7 February 2020

जळगाव : प्रचंड वाढलेल्या वाहनांच्या संख्येने प्रदूषणाने रौद्ररूप धारण केले आहे. वाढत्या प्रदूषणावर नियंत्रणासाठी अलीकडच्या काळात ई-बाईक्‍सची क्रेझ प्रस्थापित होत असून, त्यातून आदर्श घेत आर.आर. विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्यांनी बाईकवर अनोखा प्रयोग करत "इकोफ्रेंडली' यंत्रणा बसवली आहे. 

जळगाव : प्रचंड वाढलेल्या वाहनांच्या संख्येने प्रदूषणाने रौद्ररूप धारण केले आहे. वाढत्या प्रदूषणावर नियंत्रणासाठी अलीकडच्या काळात ई-बाईक्‍सची क्रेझ प्रस्थापित होत असून, त्यातून आदर्श घेत आर.आर. विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्यांनी बाईकवर अनोखा प्रयोग करत "इकोफ्रेंडली' यंत्रणा बसवली आहे. 

गेल्या काही वर्षांत वाढत्या औद्योगिकीकरणासह वाहनांच्या वाढलेल्या संख्येने वायूप्रदूषणाची स्थिती गंभीर बनली आहे. दिल्ली, मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये तर मास्क लावून फिरणे सुरू झाले असून, ही गंभीर समस्या बनली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आता प्रदूषणमुक्तीसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मेट्रो सिटीमध्ये सीएनजी गॅसवर चालणाऱ्या रिक्षा, नव्याने लॉन्च होत असलेल्या ई- बाईक्‍स आदी प्रकार याच मोहिमेचा भाग आहे. 

विद्यार्थ्यांनी घेतली प्रेरणा 
अशाच प्रदूषणमुक्त अभियानातून प्रेरणा घेऊन आर.आर. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनोखी यंत्रणा साकारली आहे. ओम नरेंद्र चौधरी आणि प्रेम भगवान बुंदे यांनी नुकत्याच सादर करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात प्रदूषणमुक्त यंत्रावर चालणारी बाईक बनवली आहे. शाळेतील विज्ञान शिक्षक यू. बी. जाधव आणि वाय. जी. चौधरी यांचे त्यांना याकामी मार्गदर्शन लाभले. 

अशी बनवली यंत्रणा 
मुलांनी घरी मोटारसायकलचे स्पेअरपार्ट काढून त्यात बदल केले. सायलेन्सरमधून निघणारा कार्बन मोनॉक्‍साईड फिल्टर करून नळीद्वारे एका पेट्रोल असलेल्या बाटलीत सोडण्यात आला. त्या बाटलीत बुडबुडे तयार होऊन गॅसची निर्मिती झाली.. तो गॅस एका पाण्याच्या बाटलीत सोडण्यात येऊन तो कार्बोरेटरच्या एअर पाइपला जोडण्यात आल्यावर मोटारसायकल सुरू होते. यामुळे पेट्रोल कमी लागते आणि प्रदूषणही कमी होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon school student non pollution bike