'मी' पणाला छेद देणारा प्रयोग पाचवर्ष राहील यशस्वी : आमदार चिमणराव पाटील 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

पारोळा : गेल्या महिनाभरापासून सत्ता स्थापनेबाबत अनेक हालचाली झाल्यात. महायुतीला जनमताने स्पष्ट बहुमत दिले. मात्र, मुख्यमंत्रिपदाच्या मतभेदामुळे शिवसेनेच्या स्वाभिमानाला धक्का पोहचला. म्हणून आमचे नेते उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्‍या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन केली. यामुळे 'मी' पणाला कुठेतरी छेदणारे समीकरण महाविकास आघाडीच्या माध्यमातून तयार झाले. हा प्रयोग नक्कीच पाच वर्ष यशस्वी राहील, असा विश्वास आमदार चिमणराव पाटील यांनी व्यक्त केला. 

सत्ता स्थापनेनंतर आमदार चिमणराव पाटील मतदार संघात परतले असून, त्यांनी महिन्‍या भरातील आलेला अनुभव कथन केला. आमदार श्री. पाटील म्हणाले, की नाट्यमय अनपेक्षित घटना लोकशाहीत व्हाव्यात ही दुदैवी बाब आहे. एकाच रात्रीत सत्ता स्थापनेचा दावा केला जातो. कॅबिनेटची बैठक होते. राष्ट्रपती राजवट उठवली जाते. बहुमत आहे म्हणून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना शपथ दिली जाते, हे ऐकून धक्काच बसला. राजकारणात असे देखील घडू शकते. हे पाहुन मनाला वेदना झाल्या. यामुळे लोकशाहीचे अवमुल्याकन झाले. १७०- १७५ आमदारांचा पाठिंबा महाविकास आघाडीला होता. म्हणून सरकार हे आपलेच येणार असा विश्वास आपल्याला होता. त्यामुळे सत्तेची गुर्मी अहंकार व मी पणास कुठेतरी छेद मिळावा. यासाठी ही तीनही पक्ष जनतेच्या कल्याणासाठी एकत्रित आली. एक महिन्‍याचा अनुभव हा राजकारणातील अद्भुत प्रत्यय होता. यातून बराच गोष्टी अनुभवयास मिळाल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे मतदारसंघात राष्ट्रवादी व शिवसेना ही एकत्रितपणे विकासाला महत्त्व देऊन जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम करेल. उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्याने मतदारसंघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खऱ्या अर्थाने विकासाला कामाची गती मिळणार आहे. 

पक्ष आदेश शिरसावंद्य 
गेल्या वीस वर्षानंतर मतदारसंघाला सत्ताधारी पक्षाचा आमदार मिळाल्याने मतदारसंघात नव्हेतर जिल्ह्यातील जनतेला आपणास मंत्री पद मिळावे, अशी अपेक्षा आहे. यातून जिल्ह्यात नव्हेतर राज्यात पदाच्या माध्यमातून गरजू प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका आपली राहणार आहे. मात्र, पक्षाने दिलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडू. पक्षादेश शिरसावंद्य मानून जनतेच्या कल्याणासाठी ही आपली आमदारकी असल्याची भूमिका आमदार पाटील यांनी व्यक्त केली. दरम्यान, विधान परिषदेवर डॉ. सतीश पाटील यांची वर्णी लागेल का? याबाबत विचारणा केली असता राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी हा निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon shena MLA chimanrao patil