शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम महिनाभरात सुरू होणार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

जळगाव ः शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा जो नकाशा (जुना) महापालिकेने 2012 मध्ये मंजूर केला होता त्याप्रमाणे शिवाजीनगर उड्डाणपूल तयार करण्याचे महापालिकेने ठरविले आहे. तशी माहितीही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठविली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागालाही तशी माहिती लेखी पाठविली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी आज "दिशा' समितीच्या सभेत दिली. यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वेला या उड्डाणपुलाचे बांधकाम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

जळगाव ः शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा जो नकाशा (जुना) महापालिकेने 2012 मध्ये मंजूर केला होता त्याप्रमाणे शिवाजीनगर उड्डाणपूल तयार करण्याचे महापालिकेने ठरविले आहे. तशी माहितीही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठविली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागालाही तशी माहिती लेखी पाठविली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी आज "दिशा' समितीच्या सभेत दिली. यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वेला या उड्डाणपुलाचे बांधकाम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 
समितीचे अध्यक्ष-खासदार ए. टी. पाटील यांनी शिवाजीनगर, भोईटेनगर आदी पुलांचे काम केव्हा सुरू होईल, केव्हा पूर्ण होईल याची माहिती सभेत विचारली होती. त्यावर आयुक्त डांगे यांनी ही माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी सांगितले, की शिवाजीनगर उड्डाणपुलाचे बांधकाम वाय किंवा एल नकाशाप्रमाणे करायचे याबाबत नागरिकांमध्ये एकवाक्‍यता नाही. यामुळे शिवाजीनगरच्या पुलाचे काम सुरू करण्यासाठी अडचणी आहेत. यामुळे बांधकाम विभागाने त्यातून बाहेर निघत पूल कोणत्या नकाशाप्रमाणे करावा याबाबत महापालिकेने लेखी द्यावे, त्याप्रमाणे आम्ही काम करू. त्यावर आयुक्तांनी वरील माहिती दिली. श्री. सोनवणे म्हणाले, की जुन्या नकाशाप्रमाणे काम सुरू करायचे असेल तर तशी लेखी आम्हाला द्या. आम्ही टेंडर काढले आहे. तुम्ही लेखी दिले तर महिन्याभरात वर्कऑर्डर काढून काम सुरू करू. 

पर्यायी रस्त्यासाठी लेंडीनाल्याचे खोलीकरण 
शिवाजीनगर पुलाचे काम सुरू केल्यास तो रस्ता बंद करण्यात येईल. नागरिकांना वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता लेंडी नाल्याच्या पुलाची उंची वाढविण्याचे काम सुरू असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

साइडपटट्यांसाठी "नही'ची "एनओसी' 
जळगाव शहरातून जाणारा महामार्ग मृत्यूचा मार्ग आहे. समांतर रस्ते कृती समितीतर्फे तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. त्यावर आमदार प्रा. सोनवणे यांनी समांतर रस्त्यांचे काय? किमान साइडपटट्यांचे काम तर करा' असे सांगितले. त्यावर बांधकाम व "नही'च्या अधिकाऱ्यांना केली. "नही'चे प्रभारी अधिकारी अरविंद काळे म्हणाले, की समांतर रस्त्यांचा 144 कोटींचा डीपीआर केंद्राकडे मंजूर आहे. फायनान्शिअल क्‍लोजर झाले की ते काम सुरू होईल. याला काही महिन्यांचा वेळ लागेल. 

साइडपट्ट्यांच्या कामाला सभेची मंजुरी 
बांधकाम विभागाचे अभियंता सोनवणे यांनी सांगितले, की समांतर रस्त्यांसाठी तातडीचा उपाय म्हणून महामार्गाला साइडपट्ट्या करण्यासाठी डीपीआर तयार करण्यास पालकमंत्र्यांनी बांधकाम विभागाला सांगितला होता. तो आम्ही तयार केला आहे. कालिंकामाता मंदिर ते बांभोरीपर्यंत रस्त्याला समांतर साइडपट्ट्यांसाठी पंधरा कोटींपर्यंत खर्चाचा अहवाल तयार केला आहे. तो शासनाकडे मंजुरीला पाठविला आहे. तो आला की त्याची वर्कऑर्डर निघेल. त्यासाठी "नही'चे एनओसी लागेल. ती देण्यासाठी अध्यक्षांनी संबंधितांना सूचना द्यावी. यालाही सभेने मंजुरी दिली आहे. 

"नही'च्या अधिकाऱ्यांची कोंडी 
आमदार उन्मेष पाटील यांनी महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या बंद कामाबाबत विचारणा केली. त्यावर "नही'चे अरविंद काळे यांनी जबाबदारी न घेता केंद्रस्तरावरून निर्णय होतात असे सांगितले. कंत्राटदार बदलला जातो, तो काम पूर्ण करीत नाही तुम्ही अधिकारी म्हणून कारवाई करीत नाही, असे सांगत काळे यांच्या कार्यपद्धती बाबत रोष व्यक्त केला. चिखली ते फागणे दरम्यान मागे साइडपट्ट्या भरल्या गेल्याचे सांगितले जाते. मात्र, संबंधित कंत्राटदाराने साइडपट्ट्या भरल्याचे जाणवत नसल्याचे आमदार सावकारे यांनी सांगितले. 

Web Title: marathi news jalgaon shivaji nagara railway brige